बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना ढाका येथील पंतप्रधानांचे निवासस्थान सोडून भारत किंवा लंडनला जाऊ शकतात. त्यांना त्यांचे भाषण रेकॉर्ड करायचे होते, पण त्यासाठी वेळ मिळाला नाही.
नवी दिल्ली : बांग्लादेशातील हिंसाचाराच्या आगीमध्ये पंतप्रधान शेख हसीना आपले निवासस्थान सोडून भारतात आल्या आहेत. सोमवारी संध्याकाळी हसीनाचे हेलिकॉप्टर उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरातील हिंडन एअरबेसवर उतरले. त्या त्ंयाच्या बहिणीसोबत आहे. त्या भारतातून लंडनला रवाना होऊ शकते.
सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास शेख हसीना यांना घेऊन जाणाऱ्या लष्करी हेलिकॉप्टरने गणभवन येथून उड्डाण केले. त्यावेळी शेख हसीना यांची बहीण शेख रेहानाही त्यांच्यासोबत होती. हसीनाचे हेलिकॉप्टर सायंकाळी भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद येथे पोहोचले. येथील हिंडन एअरबेसवर उतरल्यानंतर त्या लंडनला रवाना होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे शेख हसीना यांना देश सोडण्यापूर्वी त्यांचे भाषण रेकॉर्ड करायचे होते, परंतु त्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही.
शेख हसीना हेलिकॉप्टरने आल्या भारतात
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार शेख हसीना लष्करी हेलिकॉप्टरने भारतात आल्या आहेत. सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्या बाहेर पडल्यानंतर हजारो आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर हल्ला केला. शेख हसिना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.
बांग्लादेशाच्या लष्करप्रमुखांनी देशाला केले संबोधित
बांग्लादेशाचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी देशाला संबोधित केले आहे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा दिला आहे. आम्ही अंतरिम सरकार स्थापन करू. रविवारी 100 हून अधिक लोक मारले गेल्यानंतर सोमवारी निषेध मोर्चाची घोषणा करण्यात आली. देशभरात संचारबंदी लागू असतानाही मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले.
लष्करप्रमुख सत्ताधारी अवामी लीग आणि विरोधी बीएनपीसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी आणि लष्कराच्या मुख्यालयात इतर भागधारकांशी संवाद साधत होते कारण निदर्शकांनी "लाँग मार्च टू ढाका" सुरू केला होता.
आणखी वाचा :
भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट, BSF चे डीजी कोलकात्यात दाखल