आर्डबेग १७YO: 'विश्वातील सर्वोत्तम सिंगल माल्ट स्कॉच'

स्कॉटलंडच्या आर्डबेग १७YO सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्कीने न्यूयॉर्क वर्ल्ड स्पिरिट्स कॉम्पिटिशनमध्ये 'बेस्ट डिस्टिलर सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की'चा पुरस्कार जिंकला आहे. स्मोकी, गोड आणि सागरी चवींच्या या अनोख्या मिश्रणासाठी ही व्हिस्की प्रसिद्ध आहे.

न्यूयॉर्क: अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये झालेल्या न्यूयॉर्क वर्ल्ड स्पिरिट्स कॉम्पिटिशन (NYWSC) च्या अंतिम फेरीत तीन सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की स्पर्धेत होत्या. विशेष म्हणजे, अंतिम फेरीत पोहोचलेल्या तिन्ही सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की स्कॉटलंडमधील होत्या. जगात स्कॉटलंडला सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की उत्पादनात सध्या कोणीही मागे टाकू शकत नाही. अंतिम फेरीत पोहोचलेल्या तीन डिस्टिलरींच्या सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्कीपैकी आर्डबेग १७YO ने 'बेस्ट डिस्टिलर सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की'चा पुरस्कार जिंकला आहे. आर्डबेग १७YO; द लेजेंड रिटर्न्स सिंगल माल्ट स्कॉच ही ७५० मिलीची बाटली असून, ४०% अल्कोहोल (ABV - अल्कोहोल बाय व्हॉल्यूम) आहे.

आर्डबेग ही स्कॉटलंडच्या आयला बेटावरील सर्वात प्रसिद्ध डिस्टिलरींपैकी एक आहे. स्मोकी, गोड आणि सागरी चवींचे हे अनोखे मिश्रण या स्कॉच व्हिस्कीमध्ये आहे.

१८१५ मध्ये सुरू झालेली ही डिस्टिलरी अनेक वेळा बंद पडली, पण लोकांच्या पसंतीमुळे पुन्हा सुरू झाली. २० व्या शतकाच्या बहुतांश काळात आर्डबेग डिस्टिलरी आर्थिक अडचणीत होती. यामुळेच ती अनेक वेळा बंद पडली. १९९७ मध्ये ग्लेनमोरांगी डिस्टिलरीने आर्डबेग विकत घेतली आणि तिला पुन्हा सुरू केले. मोएट हेनेसी लुई व्हिटॉन (LVMH) आता या दोन्ही कंपन्यांची मालकीण आहे.

तेव्हापासून आर्डबेगने आपल्या कल्ट व्हिस्की पुन्हा व्हिस्की प्रेमींना ओपन केल्या आहेत. आतापर्यंत अनेक मर्यादित आवृत्त्या (लिमिटेड एडिशन्स) आल्या आहेत. यापैकी बहुतेक आयला व्हिस्कीच्या बोल्ड, स्मोकी आणि औषधी/फेनॉलिक चवीवर भर देतात. डिस्टिलरी नॉन-चिल-फिल्टर्ड व्हिस्की बनवण्याचा अभिमान बाळगते, ज्यामुळे नैसर्गिक चव टिकून राहते.

सूचना: मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Share this article