Maharashtra Day : पुण्यातील व्यक्तीचा जपानमध्ये डंका, उभारला शिवाजी महाराजांचा पुतळा

Published : May 01, 2025, 08:44 AM IST
योगेंद्र पुराणिक

सार

जपानमधील टोकियो मध्ये कसाई भागात एक मराठी विक्रमी व्यक्ती. पुण्यात शनिवार पेठेतील शनिवार पोलीस चौकी जवळ त्यांचा वाडा होता. त्यांनी तेथील घराशेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे.

टोकियो - जपानमधील टोकियो मध्ये कसाई भागात एक मराठी विक्रमी व्यक्ती. पुण्यात शनिवार पेठेतील शनिवार पोलीस चौकी जवळ त्यांचा वाडा होता. तो माणूस आता १९९५ ला जपान ची स्कॉलरशिप घेऊन जपान मधे जातो आणि तिथे एका प्रायव्हेट शाळेचा प्रिन्सिपल होतो.

त्यांची आई तिथे पुरण पोळी ते साबुदाणा खिचडी पर्यंत सर्व भारतीय चटण्या तसेच भारतीय पोशाख शिवते व भारतीय रेस्टोरंटही चालवते.

‌‌हा माणूस टोकियो मधे स्वतः तीन मजली प्रचंड मोठ घर बांधतो. घरात मराठी पुस्तकांची लायब्ररी करतो, तसेच मराठी भाषा शिकवण्याचे कलासेसही घेतो. सर्व जपानी शाळांना आग्रह धरतो. हाच भारतीय मराठी माणूस जपान मध्ये नंतर तिथं आमदार होतो. अजून बरंच काही आहे. पण सगळ्यावर कळस म्हणजे आता त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या घराशेजारी उभारला आहे. पुण्यातील खटावकर यांनी तो तयार केला. तो जपानला विमानाने १० लाख रुपये फक्त वाहतूक खर्च करुन नेला व ८ मार्च २०२५ ला तेथे उभारला. सुमारे ९०० भारतीय लोक उपस्थित होते. यांच्याकडे सुमारे ३०० महाराजांनी लिहिलेली हस्तलिखित पत्रांचा खजिना आहे.

ह्या माणसाचं नांव आहे योगेंद्र पुराणिक

PREV

Recommended Stories

Japan Earthquake : जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा, उंच लाटांची भीती
पाकिस्तानच्या संसदेत खरंच गाढव शिरला? व्हायरल व्हिडिओमागील सत्य आले समोर