
७-इलेव्हन जपान सध्या भारतीय आणि जपानी पदार्थांचे फ्युजन करून पाहत आहे, ज्यामध्ये त्यांनी बिर्याणीला एका ओनिगिरीच्या आकारात आणले आहे. बिर्याणी ओनिगिरी किंवा बिर्याणी ओमुसुबी नावाच्या या उत्पादनामध्ये मसालेदार बासमती तांदूळ आणि चिकन एकत्र करून त्याला जपानी लोकांना परिचित असलेल्या कॉम्पॅक्ट स्नॅकचा आकार दिला गेला आहे.
ही डिश टोकियोच्या कांडा भागातील 'बिर्याणी ओसावा' या रिझर्व्हेशन-ओन्ली हॉटेलसोबत विकसित करण्यात आली आहे. दहा सीट असलेल्या या हॉटेलमध्ये रोज फक्त बिर्याणीचाच एक मेन्यू असतो आणि नुकतेच त्यांना मिशेलिन गाईड टोकियो २०२६ मध्ये बिब गोरमंडचा मान मिळाला आहे.
ओनिगिरी, ज्याला ओमुसुबी किंवा निगिरीमेशी असेही म्हणतात, हा एक पारंपरिक जपानी राईस बॉल आहे ज्यात मांस भरलेले असते आणि सहसा तो नोरीमध्ये गुंडाळलेला असतो. मात्र, बिर्याणी ओमुसुबीमध्ये हा नियम मोडून चक्क बिर्याणीचाच बॉल बनवण्यात आला आहे, ज्यात कोणताही सीवीड रॅप नाही. भारतीय मसाले, बासमती तांदूळ आणि चिकन अशा परिचित जपानी स्नॅकच्या रूपात ग्राहकांना दिले जात आहे.
【ビリヤニおむすび、セブン-イレブンでエリア限定発売】
セブン-イレブンさんと一緒に、ビリヤニのおむすびを作りました。
何度も試作と調整を重ね、ようやくビリヤニ大澤らしい味わいに仕上がりました。 バスマティライスのおいしさ、スパイスの香り、ビリヤニならではの軽い食感が出るよう、工程の一つひとつを丁寧に仕上げていただきました。 明日11月17日(火)から、墨田・銀座・船橋・習志野エリアのセブン-イレブンの一部店舗でテスト販売が始まります。
お近くで見かけたら、ぜひ手に取っていただけるとうれしいです。
※店舗によっては取り扱いがない場合があります。
#ビリヤニ大澤 #ビリヤニおむすび #セブンイレブン
— ビリヤニ大澤【新・公式】 (@BiryaniOsawa) November 16, 2026
बिर्याणी ओसावाने सांगितले की हे उत्पादन अनेक चाचण्या आणि सुधारणांनंतरच तयार मानले गेले. १६ नोव्हेंबरला एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) केलेल्या एका पोस्टमध्ये या हॉटेलने लिहिले की, त्यांनी ७-इलेव्हनसोबत हे आयटम तयार करण्यासाठी काम केले असून बासमती तांदळाची चव, मसाल्यांचा सुगंध आणि बिर्याणीची हलकी पोत खुलवण्यासाठी प्रत्येक टप्प्यात सुधारणा केल्या आहेत.
बिर्याणी ओमुसुबीची किंमत करपूर्व २४८ येन आणि करासहित सुमारे २६८ येन आहे. १७ नोव्हेंबर २०२६ पासून याची प्रायोगिक तत्त्वावर विक्री सुरू झाली असली तरी उपलब्धता मर्यादित आहे.
टोकियोतील सुमिदा आणि गिन्झा तसेच चिबामधील फुनाबाशी आणि नाराशिनो या चार भागांतील निवडक ७-इलेव्हन आऊटलेट्सवरच हे उपलब्ध असेल. या भागातही प्रत्येक दुकानात ते मिळणार नाही.