इस्त्रायलमध्ये १६,००० भारतीय बांधकाम कामगार

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांना देशात प्रवेश नाकारला. त्यानंतर इस्रायलने विदेशी बांधकाम कामगारांकडे वळले.
 

ेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हमासच्या अचानक हल्ल्यानंतर, इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांवर बंदी घातल्यामुळे रिक्त झालेल्या बांधकाम कामांमध्ये भारतीय कामगार आले. हमासच्या हल्ल्यापूर्वी इस्रायलमधील बहुतेक बांधकाम कामगार पॅलेस्टिनी होते. मात्र ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याने सर्व काही बदलले. त्यानंतर पॅलेस्टिनी लोकांना इस्रायलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. या रिक्त जागी आता भारतीय आणि चिनी कामगार काम करत आहेत. 

जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि वेगाने वाढणारा देश म्हणजे भारत. मात्र लोकसंख्या वाढीमुळे बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे भारतातून काम शोधण्यासाठी परदेशात जाणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ भारतीय इस्रायलमध्ये काम करत आहेत, परंतु एका वर्षात या कामगार दलात मोठी वाढ झाली आहे. इस्रायलमधील भारतीयांची सुरुवातीची कामे प्रामुख्याने वृद्धांची काळजी, हिरे व्यापार आणि आयटी व्यवसाय होती. मात्र, नवीन कामे बांधकाम कामगार म्हणून आहेत. 

इस्रायलचे युद्ध पॅलेस्टाईन ओलांडून लेबनॉन आणि सीरियापर्यंत पसरल्याने देशातील बांधकाम क्षेत्रात अधिक रोजगार संधी निर्माण झाल्या. त्यामुळे भारतातील बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये मागणी वाढली आहे, असे दिल्लीस्थित डायनॅमिक स्टाफिंग सर्व्हिसेसचे अध्यक्ष समीर खोसला यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातून सर्वाधिक बांधकाम कामगार इस्रायलमध्ये आले आहेत. हमासच्या हल्ल्यापूर्वी ८०,००० पॅलेस्टिनी आणि २६,००० विदेशी इस्रायलच्या बांधकाम क्षेत्रात काम करत होते, असे सेंट्रल बँक ऑफ इस्रायलमधील इयाल अर्गेव्ह म्हणतात.  मात्र आता पॅलेस्टिनी लोकांना इस्रायलमध्ये प्रवेश नसल्याने त्या रिक्त जागा भरून काढण्यासाठी विदेशी बांधकाम कामगार आणले जात आहेत. सध्या १६,००० बांधकाम कामगार भारतातून आले आहेत, परंतु अधिक बांधकाम कामगारांची आवश्यकता असल्याने भारतीयांना अधिक संधी आहेत, असे वृत्त आहे.

Share this article