Pakistan Mosque Blast: पाकिस्तानमध्ये मशिदीत भीषण स्फोट; १५ जणांचा मृत्यू, ५६ जखमी

vivek panmand   | CMS
Published : Sep 18, 2026, 06:47 PM IST
Pakistan Mosque Blast: पाकिस्तानमध्ये मशिदीत भीषण स्फोट; १५ जणांचा मृत्यू, ५६ जखमी

सार

पाकिस्तानातील एका मशिदीत झालेल्या स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात हा स्फोट झाला.

पेशावर: पाकिस्तानात शुक्रवारी नमाज पठणादरम्यान मशिदीत झालेल्या भीषण स्फोटात मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. या घटनेत ५६ जण जखमी झाले आहेत. वायव्य पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात ही घटना घडली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून स्फोट झालेल्या ठिकाणाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आल्याचं वृत्त पाकिस्तानच्या जिओ न्यूजने दिलं आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात सुरू केलेल्या कारवाईदरम्यानच हा नवा हल्ला झाला आहे.

पोलीस कार्यालयाला लागून असलेल्या मशिदीत हा स्फोट झाला. एका हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली गाडी थेट मशिदीत घुसवली, अशी माहिती प्रांतीय पोलीस प्रमुख झुल्फिकार हमीद यांनी दिल्याचे असोसिएटेड प्रेस (AP) या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. स्फोटानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता.

मृतांमध्ये ५ पोलीस अधिकारी आणि १० नागरिकांचा समावेश असल्याचं रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. जखमींपैकी बहुतांश लोक मशिदीत नमाज अदा करण्यासाठी आले होते. यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. दोन सशस्त्र हल्लेखोरांनी पोलीस कंपाऊंडमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या मशिदीचे फोटोही समोर आले आहेत.

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त करत अधिकाऱ्यांना बचावकार्य वेगवान करण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी आणि राज्यपाल फैसल करीम कुंडी यांनीही या स्फोटाचा निषेध करत जखमींप्रती संवेदना व्यक्त केली. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण, 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) या पाकिस्तानी तालिबानचा यामागे हात असल्याचा संशय आहे. हांगू जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर झालेल्या बॉम्बहल्ल्यात ६ जवान शहीद झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच हा दुसरा हल्ला झाला आहे.

खैबर पख्तूनख्वा प्रांत अफगाणिस्तानच्या सीमेला लागून आहे. अफगाणिस्तानातील तालिबानशी छुपे संबंध असलेला पाकिस्तानी तालिबान गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात पोलीस आणि नागरिकांना लक्ष्य करत आहे. पाकिस्तानी तालिबानला अफगाणिस्तानचा पाठिंबा असल्याचा आरोप पाकिस्तान सरकारने केला आहे, मात्र अफगाण सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Apple Stock: आयफोनच्या विक्रीत घट होण्याची शक्यता, ॲपलच्या शेअरमध्ये घसरण
Google Cloud Outage: गुगल क्लाउड डाऊन! ब्रिटनमध्ये बँकिंग आणि डिलिव्हरी सेवा ठप्प