Viral Video: गर्लफ्रेंडसोबत बेडवर रोमान्स करत होता नवरा, पत्नीने रंगेहाथ पकडताच झाला राडा; व्हिडीओ व्हायरल

Published : Mar 28, 2026, 03:51 PM IST

Viral Video नवरा दुसऱ्या स्त्रीसोबत खासगी क्षण घालवत असताना पत्नीने त्याला रंगेहाथ पकडलं. यानंतर नवरा, बायको आणि त्याची प्रेयसी यांच्यात झालेल्या जोरदार भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

PREV
15
अनैतिक संबंध
अनैतिक संबंधात असलेल्या नवऱ्याला पत्नीने रंगेहाथ पकडून चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये नवऱ्याची प्रेयसी आपला चेहरा कपड्याने झाकताना दिसत आहे.
25
तिघांमध्ये जोरदार राडा
फेसबुक, इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या तिघांच्या भांडणाचा व्हिडीओ शेअर होत आहे. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरी कमेंट्स करून यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
35
थायलंडमधील घटना
रिपोर्ट्सनुसार, ही घटना थायलंडमधील असल्याचं म्हटलं जात आहे. एक विवाहित पुरुष आपल्या प्रेयसीसोबत खोलीत खासगी वेळ घालवत होता. नवरा दुसऱ्या तरुणीसोबत असल्याची माहिती मिळताच पत्नी थेट घटनास्थळी पोहोचली. दरवाजा उघडताच नवऱ्याला मोठा धक्का बसला.
45
त्याच्यासाठी दोघींमध्ये भांडण

प्रियकराची बायको आल्याचं पाहताच प्रेयसीने आपला चेहरा कपड्याने झाकला. पत्नीने खोलीत नवऱ्यासोबत जोरदार भांडण केलं. इतकंच नाही, तर तिने तरुणीवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. पण नवऱ्याने पत्नीला तिला मारण्यापासून रोखलं.

55
व्हिडीओ व्हायरल

यावरून नवरा-बायकोमध्ये पुन्हा एकदा भांडण पेटलं. पत्नीसोबत आलेल्या काही लोकांनी हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. सध्या या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Read more Photos on

Recommended Stories