Coconut Oil Bottles : खोबरेल तेलाच्या बाटल्या गोल का असतात?, वाचा, उंदराचा याच्याशी काय संबंध...

Published : Jan 07, 2026, 09:30 AM IST

Coconut Oil Bottles : कोणत्याही कंपनीच्या खोबरेल तेलाच्या बाटल्या साधारणपणे एकाच आकाराच्या असतात. पण सुरुवातीला त्यांचा आकार वेगळा होता. पण उंदरांमुळे त्यांचा आकार बदलला हे अनेकांना माहिती नसेल. त्याबाबत जाणून घेऊयात.  

PREV
15
सुरुवातीला टिनच्या डब्यांमध्ये -

पूर्वी खोबरेल तेल टिनच्या डब्यांमध्ये विकले जायचे. ते मजबूत असल्यामुळे कोणतीही अडचण येत नव्हती. पण टिनच्या डब्यांना गंज लागणे आणि नंतर प्लास्टिकचा वापर वाढल्यामुळे कंपन्यांनी टिनच्या डब्यांऐवजी प्लास्टिक पॅकिंगचा वापर सुरू केला. तेव्हा खोबरेल तेल चौरस (स्क्वेअर) आकाराच्या प्लास्टिक डब्यांमध्ये भरण्यास सुरुवात झाली.

25
प्लास्टिकचे डबे येताच समस्या सुरू -

खोबरेल तेलाच्या वासाकडे उंदीर लवकर आकर्षित होतात. दुकाने आणि गोदामांमध्ये ठेवलेले चौरस आकाराचे प्लास्टिकचे डबे उंदीर कुरतडायचे. यामुळे तेल गळायचे आणि संपूर्ण डबा निरुपयोगी व्हायचा. दुकानदारांना मोठे नुकसान सहन करावे लागत होते.

35
चौरस डबे उंदरांसाठी सोपे का होते? -

चौरस आकाराच्या डब्यांना कोपरे असतात. ते कोपरे उंदीर आपल्या दातांनी सहज कुरतडू शकत होते. एकदा लहान छिद्र पडले की, आतील खोबरेल तेलाचा वास आणखी बाहेर यायचा. मग आणखी उंदीर जमा होऊन डब्याचे पूर्ण नुकसान करायचे.

45
गोल बाटलीची कल्पना कशी सुचली? -

या समस्येवर उपाय म्हणून, मॅरिको (Marico) कंपनीने एक नवीन कल्पना आणली. त्यांनी खोबरेल तेल गोल (राऊंड) आकाराच्या प्लास्टिक बाटल्यांमध्ये भरायला सुरुवात केली. गोल बाटलीला कोपरे नसल्यामुळे उंदरांना ती कुरतडणे शक्य नव्हते. तसेच, पॅकिंग अधिक घट्ट करून तेलाचा वास बाहेर येणार नाही याची काळजी घेतली.

55
एक छोटा बदल मोठा उपाय ठरला -

मॅरिकोने केलेला हा छोटा 'इंजिनिअरिंग बदल' मोठ्या समस्येवरचा उपाय ठरला. उंदरांचा त्रास कमी झाला आणि दुकानदारांचे नुकसान थांबले. तेव्हापासून, पॅराशूटसारख्या प्रसिद्ध ब्रँड्ससोबतच जवळपास सर्वच कंपन्या खोबरेल तेल गोल बाटल्यांमध्येच विकत आहेत. अशाप्रकारे, उंदरांमुळे घेतलेल्या एका छोट्या निर्णयाने खोबरेल तेलाच्या पॅकिंगमध्ये मोठा बदल घडवून आणला.

Read more Photos on

Recommended Stories