Investment Rules: जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचा शेअर मार्केटमधला प्रवास प्रत्येक गुंतवणूकदारासाठी एक उत्तम गाईड आहे. मार्केट कितीही वर-खाली झालं किंवा मंदी आली, तरी त्यांनी काही खास नियम पाळले आणि यश मिळवलं.
हे ५ सिक्रेट्स समजले तर शेअर मार्केटमध्ये नुकसान होणार नाही
मुंबई : जगातील सर्वात लोकप्रिय आणि दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ 'बर्कशायर हॅथवे' कंपनीचं नेतृत्व केल्यानंतर, ते आता चेअरमन पदावरून पायउतार होत आहेत. ९६ वर्षीय या अब्जाधीशाची एकूण संपत्ती भारतीय चलनात तब्बल १३.८९ लाख कोटी रुपये ($१४४.६ अब्ज) आहे.
चेअरमन पद सोडलं तरी ते बोर्ड डायरेक्टर म्हणून काम पाहत राहतील. त्यांचा मुलगा हॉवर्ड बफे आता नवीन चेअरमन म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे. वॉरेन बफे म्हटलं की त्यांची 'व्हॅल्यू-इन्व्हेस्टिंग' स्टाईल आणि शिस्तीने संपत्ती निर्माण करण्याची पद्धत आठवते. पदाचा निरोप घेताना त्यांनी सामान्य गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी ५ पॉवरफुल सिक्रेट रूल्स सांगितले आहेत.
26
मार्केटमधली भीती आणि हाव यापासून दूर राहा
बफे यांचा सर्वात प्रसिद्ध गुंतवणुकीचा धडा म्हणजे, "जेव्हा मार्केटमध्ये सगळे लोक हावरट होतात, तेव्हा तुम्ही घाबरून राहा. आणि जेव्हा सगळे घाबरलेले असतात, तेव्हा तुम्ही धाडस दाखवून गुंतवणूक करा." मार्केटमध्ये सगळ्यांच्या मागे आंधळेपणाने धावू नका, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मार्केट खूप वर गेलेलं असताना किंवा खूप पॅनिक असताना घाईघाईने निर्णय घेऊ नका. भावनेच्या आहारी न जाता स्ट्रॅटेजी वापरून काम केल्यास गुंतवणूकदार सुरक्षित राहतात.
36
चांगले बिझनेस योग्य किमतीतच विकत घ्या
बफे यांची गुंतवणुकीची पद्धत नेहमीच खूप सोपी आणि थेट असते. चांगल्या कंपन्यांचे किंवा बिझनेसचे शेअर्स जेव्हा कमी किमतीत मिळतात, तेव्हाच ते विकत घ्या. शेअर्सचे भाव खूप जास्त वाढलेले असताना त्यांच्यापासून शक्य तितकं दूर राहा. आपण निवडलेल्या चांगल्या गुंतवणुकीवर विश्वास ठेवा आणि संयमाने वाट पाहा. हाच 'व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग'चा मुख्य नियम आहे. याच पद्धतीचा वापर करून बफे यांनी शेअर मार्केटमध्ये अनेक दशके जबरदस्त रिटर्न्स मिळवले आहेत.
वॉरेन बफे आणि त्यांचे पार्टनर चार्ली मुंगर यांनी नेहमी एकाच गुंतवणूक सूत्रावर विश्वास ठेवला. ते म्हणजे "हळूहळू, पण योग्य मार्गाने पुढे जाणं". मार्केटमधल्या प्रत्येक छोट्या बदलावर लगेच रिअॅक्ट करणं ही बफे यांची स्टाईल नाही. संयम ठेवणं हाच त्यांच्या दीर्घकालीन यशाचा पाया आहे. प्रोफेसर टॉड फिंकेल बफे यांच्याबद्दल बोलताना म्हणतात, "वॉरेन यांच्याकडून शिकलेल्या गोष्टींचा माझ्या वैयक्तिक आयुष्यात आणि आर्थिक निर्णयांमध्ये रोज सकारात्मक प्रभाव पडतो."
56
तुमचे निर्णय कोण प्रभावित करतंय यावर लक्ष ठेवा
आपण कोणासोबत वेळ घालवतो, याचा आपल्या आयुष्यावर आणि आपण घेणाऱ्या निर्णयांवर खूप मोठा परिणाम होतो, यावर बफे यांचा ठाम विश्वास आहे. "तुम्ही जशा लोकांसोबत राहाल, तसे विचार तुम्हाला येतील. त्यामुळे तुमच्या आजूबाजूची माणसं खूप महत्त्वाची आहेत," असा सल्ला ते देतात. गुंतवणुकीच्या बाबतीत योग्य तज्ज्ञ आणि चांगल्या विचारांच्या लोकांचा सल्ला घेतल्यास मार्केटमध्ये चुकीची पावलं उचलण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
66
कधीही भरून न निघणाऱ्या नुकसानीपासून स्वतःला वाचवा
बफे यांचे गुंतवणुकीचे नियम खूप स्पष्ट आहेत. त्यांचा पहिला नियम सांगतो: "कधीही तुमचे स्वतःचे पैसे गमावू नका." आणि दुसरा नियम: "कोणत्याही परिस्थितीत पहिला नियम विसरू नका." याशिवाय, "जेव्हा समुद्राच्या लाटा ओसरतात, तेव्हाच कोण कपड्यांविना पोहत होतं हे स्पष्ट दिसतं," असं बफे नेहमी म्हणतात. याचा अर्थ असा की, जेव्हा मार्केटमध्ये कठीण काळ किंवा मंदी येते, तेव्हाच विनाकारण रिस्क घेणारे गुंतवणूकदार उघडे पडतात. प्रत्येक गुंतवणूकदाराने नेहमी रिस्क मॅनेजमेंटला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिलाय.