
नवी दिल्ली: चायनीज स्मार्टफोन ब्रँड Vivo ने आपल्या T5 सीरिजमधला पहिला स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या फोनचं नाव Vivo T5x 5G असं आहे. हा एक मिड-रेंज स्मार्टफोन असून तो मिलिटरी-ग्रेड ड्युरॅबिलिटीसह (military-grade durability) येतो. याला IP68 आणि IP69+ रेटिंग मिळालं आहे. 7,200mAh क्षमतेची मोठी बॅटरी आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 टर्बो चिपसेट ही या फोनची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
या मिड-रेंज Vivo T5x 5G फोनमध्ये 6.76-इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले दिला आहे. या स्क्रीनला 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,200 निट्स पीक ब्राइटनेस मिळतो. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 टर्बो चिपसेटवर चालतो. यात 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजचे पर्याय मिळतात. फोनमध्ये 7,200mAh ची बॅटरी आहे, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. इतर फीचर्समध्ये ड्युअल नॅनो सिम, अँड्रॉइड 16 वर आधारित ओरिजिनओएस 6, आणि सुधारित 'आय कम्फर्ट मोड' यांचा समावेश आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झाल्यास, यात 50-मेगापिक्सलचा सोनी IMX852 मुख्य कॅमेरा, 2MP बोकेह शूटर आणि 32MP सेल्फी कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी Vivo T5x 5G मध्ये 5G, ब्लूटूथ 5.4, जीपीएस, बायडू, ग्लोनास, गॅलिलिओ, वाय-फाय आणि यूएसबी टाइप-सी पोर्टसारखे पर्याय दिले आहेत.
Vivo T5x 5G च्या 6GB + 128GB रॅम व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. तर 8GB + 128GB व्हेरिएंट 20,999 रुपयांना आणि 8GB + 256GB मॉडेल 22,999 रुपयांना मिळेल. हा फोन 24 मार्चपासून फ्लिपकार्ट, विवो इंडिया ई-स्टोअर आणि इतर पार्टनर रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. फोन सायबर ग्रीन आणि स्टार सिल्व्हर या दोन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे.