विरोट कोहलीच्या नवीन वर्षाच्या पोस्टला 80 लाख लाईक्स; चाहते म्हणाले दृष्ट लागेल

Published : Jan 02, 2026, 11:28 AM IST

दुबई: सर्वांनी 2026 चे उत्साहात  स्वागत केले आहे. यात विराट कोहलीने नवीन वर्षाचे स्वागत दुबईत केले. दरम्यान, पत्नी अनुष्कासोबतचा एक फोटो कोहलीने इंस्टाग्रामवर शेअर केला असून, 24 तासांच्या आत त्याला 80 लाख लोकांनी लाईक केले आहे. 

PREV
18
कोहलीचे दुबईत नवीन वर्षाचे सेलिब्रेशन

दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली २०२६ हे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दुबईला गेला होता. किंग कोहलीने आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत नवीन वर्षाचा आनंद साजरा केला आहे. 

28
विरुष्का जोडप्याने केले नवीन वर्षाचे ज्ल्लोषात स्वागत

नवीन वर्षाचे स्वागत करताना विराट कोहलीने इंस्टाग्रामवर पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला.

38
24 तासांत 80 लाख लाईक्स

विराट कोहलीच्या या फोटोला सोशल मीडियावर 24 तासांपेक्षा कमी वेळेत तब्बल 80 लाख लाईक्स मिळाले आहेत.  ही संख्या त्यानंतरही वाढत चालली आहे.

48
कोहलीच्या फोटोने जिंकली चाहत्यांची मने

विराट कोहली निळ्या सूटमध्ये सुंदर दिसत आहे, तर अनुष्का शर्मा काळ्या ड्रेसमध्ये चमकत आहे. या फोटोने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. अनेक जणांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

58
चाहत्यांकडून विरुष्का जोडप्याचे भरभरू न कौतुक

या फोटोवर नेटकऱ्यांनी 'राजा आणि राणीची जोडी' अशी कमेंट केली आहे. ही जोडी पाहून दृष्ट लागेल, अशाही कमेंट्स केल्या आहेत. 

68
15 वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी खेळला कोहली

क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, विराट कोहली 15 वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दिल्लीकडून दोन सामने खेळला. त्याने एक शतक आणि एका अर्धशतकासह 104.00 च्या सरासरीने 208 धावा केल्या होत्या.

78
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळणार कोहली

 विराट कोहली 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाकडून खेळणार आहे.

88
गगनाला भिडली कोहलीची क्रेझ

विराट कोहलीने कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. आता 11 जानेवारी रोजी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याची तिकिटे लिलावासाठी ठेवल्यानंतर अवघ्या 8 मिनिटांत सर्व तिकिटे विकली गेली, यावरून कोहलीची क्रेझ किती आहे हे दिसून येते.

Read more Photos on

Recommended Stories