
Vertical Garden: घरातील बागकाम हा एक उत्तम छंद असून, याशिवाय मनाला शांती मिळते आणि ताजा, सेंद्रिय भाजीपाला तसेच फुले मिळतात. ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होते. अशा बागेत शोभेची झाडे, औषधी वनस्पती, फुलझाडे आणि ताज्या भाज्या (किचन गार्डन) लावता येतात. स्वयंपाकघरात लागणारी कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना, मिरच्या, टोमॅटो अशा भाज्या कुंडीत सहज उगवता येतात. मात्र जागा कमी असेल तर आपल्या या छंदाला मुरड घालावी लागते.
मात्र हल्ली व्हर्टिकल गार्डनिंगचा ट्रेंड खूप वाढतोय, विशेषतः अशा लोकांमध्ये ज्यांच्याकडे जागा कमी आहे पण झाडं लावण्याची आवड आहे. बाल्कनी, भिंत, टेरेस किंवा मोकळ्या जागेला व्हर्टिकल गार्डनमध्ये बदलल्यास तुमच्या घराचं सौंदर्य अनेक पटींनी वाढू शकतं. योग्य झाडांची निवड केल्यास तुमचं घर फक्त हिरवंगारच होत नाही, तर हवा शुद्ध व्हायला आणि एक सकारात्मक वातावरण तयार व्हायलाही मदत होते. चला, जाणून घेऊया अशा 7 सर्वोत्तम झाडांबद्दल जी व्हर्टिकल गार्डनसाठी अगदी परफेक्ट आहेत.
व्हर्टिकल गार्डनसाठी मनी प्लांट हे सर्वात लोकप्रिय आणि सोपं झाड मानलं जातं. हे कमी प्रकाशातही चांगलं वाढतं आणि त्याच्या वेली भिंतींवर खूप सुंदर दिसतात. हे झाड हवा शुद्ध करण्यासही मदत करतं आणि कमी देखभालीत वेगाने पसरतं. याला बाल्कनी किंवा लिव्हिंग एरियाच्या भिंतीवर लावणं हा एक उत्तम पर्याय आहे.
फिलोडेंड्रॉनची हृदयाच्या आकाराची पानं व्हर्टिकल गार्डनला एक ट्रॉपिकल लुक देतात. हे झाड घराच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी चांगलं वाढतं. त्याच्या वेली खालच्या दिशेने लटकतात, ज्यामुळे भिंतीला एक नैसर्गिक आणि फ्रेश लुक मिळतो. या झाडाला जास्त पाण्याची गरज नसते आणि थोड्याशा मेहनतीत ते छान दिसतं.
व्हर्टिकल गार्डनसाठी इंग्लिश आयव्ही हा एक क्लासिक पर्याय आहे. हे झाड वेगाने पसरतं आणि भिंतीवर हिरव्या पडद्यासारखा लुक देतं. हे ऊन आणि हलकी सावली दोन्ही ठिकाणी वाढू शकतं. जर तुम्हाला तुमची भिंत पूर्णपणे हिरवीगार दिसावी असं वाटत असेल, तर हे झाड तुमच्यासाठी आदर्श आहे.
फर्नची नाजूक आणि दाट पानं व्हर्टिकल गार्डनला एक सॉफ्ट आणि एलिगेंट लुक देतात. हे दमट हवामान पसंत करणारं झाड आहे, त्यामुळे ते बाथरूम किंवा सावली असलेल्या बाल्कनीसाठी योग्य ठरतं. फर्न प्लांट घरात थंडावा आणि ताजेपणा आणतो.
स्पायडर प्लांट त्याच्या लांब, पट्टेदार पानांमुळे व्हर्टिकल गार्डनमध्ये एक वेगळीच भर घालतो. हे झाड हवा शुद्ध करण्याच्या (Air Purifying) गुणधर्मांसाठी ओळखलं जातं आणि ते लहान मुलं तसंच पाळीव प्राण्यांसाठी सुरक्षित आहे. त्याच्या लटकणाऱ्या फांद्या भिंतीची शोभा वाढवतात.
हे निऑन हिरव्या रंगाचं झाड व्हर्टिकल गार्डनमध्ये रंग भरतं. त्याची चमकदार पानं कमी प्रकाशातही छान दिसतात. हे झाड आधुनिक घरांमध्ये खूप पसंत केलं जातं आणि अगदी कमी देखभालीत वाढतं.
जर तुम्ही कमी पाणी लागणारी झाडं शोधत असाल, तर सक्युलेंट्स व्हर्टिकल गार्डनसाठी एक उत्तम पर्याय आहेत. वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगांचे सक्युलेंट्स भिंतींना एक युनिक आणि ट्रेंडी लुक देतात. या झाडांना ऊन आवडतं आणि त्यांना खूप कमी देखभालीची गरज असते.