Shoe Box DIY: नवीन बुटांचा बॉक्स फेकू नका! स्टोरेजपासून डेकोरपर्यंत, 'या' ४ भन्नाट आयडिया वापरून बघा

Published : Jun 15, 2026, 05:41 PM IST
Shoe Box DIY: नवीन बुटांचा बॉक्स फेकू नका! स्टोरेजपासून डेकोरपर्यंत, 'या' ४ भन्नाट आयडिया वापरून बघा

सार

Shoe Box DIY आपण नवीन चपला किंवा बूट आणल्यावर उरलेले बॉक्स फेकून देता का? थांबा! या साध्या बॉक्समधून तुम्ही स्टोरेज ऑर्गनायझर, मुलांसाठी खेळणी आणि सुंदर लॅम्पसुद्धा बनवू शकता. कसं ते जाणून घ्या.

Cardboard Box Crafts: जेव्हा आपण नवीन बूट किंवा चप्पल विकत घेतो, तेव्हा ते एका मजबूत कार्डबोर्ड बॉक्समध्ये येतात. अनेकदा आपण हे बॉक्स निरुपयोगी समजून फेकून देतो किंवा घरात कुठेतरी पडून राहतात. पण हेच शू बॉक्स तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच ४ सोप्या आणि कामाच्या आयडिया सांगणार आहोत, ज्या वापरून तुम्ही या बॉक्सचा शानदार उपयोग करू शकता.

शू बॉक्स स्टोरेज ऑर्गनायझर

शू बॉक्स पासून स्टोरेज ऑर्गनायझर बनवणं हा सर्वात सोपा आणि उपयोगी उपाय आहे. यासाठी बॉक्स आधी स्वच्छ करा आणि त्यावर रंगीत कागद, कापड किंवा वॉलपेपर लावा. तुम्ही हवं तर त्यावर काही डेकोरेटिव्ह वस्तूही चिकटवू शकता. यात तुम्ही कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, चार्जिंग केबल्स किंवा किचनमधल्या लहान-सहान वस्तू सहज ठेवू शकता.

 

डॉल हाउस-टॉय हाउस

तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि त्यांच्यासाठी काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असेल, तर शू बॉक्सपासून एक सुंदर डॉल हाउस बनवू शकता. यासाठी बॉक्सला कापून खिडक्या आणि दरवाजे बनवा. आतून आणि बाहेरून रंग द्या आणि बेड, खुर्ची असं छोटं-छोटं फर्निचर ठेवा. मुलांसाठी हे एक मजेशीर आणि क्रिएटिव्ह खेळणं तयार होईल.

LED लॅम्प

शू बॉक्सचा वापर करून एक सुंदर LED लॅम्पही बनवता येतो. बॉक्सवर लहान-लहान डिझाइनची छिद्रं पाडा आणि आतमध्ये LED लाइट लावा. जेव्हा तुम्ही लाइट लावाल, तेव्हा या छिद्रांमधून येणारा प्रकाश खूप सुंदर दिसतो आणि तुमच्या खोलीला एक वेगळाच लुक मिळतो.

ड्रॉवर ऑर्गनाइजर

कपाटातल्या ड्रॉवरमध्ये सामान अस्ताव्यस्त पसरलेलं असेल, तर शू बॉक्स एक उत्तम ड्रॉवर ऑर्गनायझर म्हणून कामी येऊ शकतो. यात तुम्ही अंडरगारमेंट्स, लहान कपडे, ॲक्सेसरीज आणि इतर छोट्या वस्तू सहजपणे ठेवू शकता. बाहेरून कागद किंवा कापडाने कव्हर करून तुम्ही त्याला अजून सुंदर बनवू शकता.

सतत विचारले जाणारे प्रश्न

1: शू बॉक्स मजबूत स्टोरेजसाठी योग्य आहे का?

हो, जर त्याला व्यवस्थित कव्हर केलं, तर हलक्या वस्तू ठेवण्यासाठी तो खूप उपयोगी ठरतो.

2: शू बॉक्सपासून मुलांसाठी खेळणी बनवता येतात का?

हो, यापासून डॉल हाउस आणि टॉय हाउस सहज बनवता येतात.

3: LED लॅम्प बनवण्यासाठी शू बॉक्स वापरणं सुरक्षित आहे का?

हो, फक्त LED आणि व्हेंटिलेशनची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Underground Parking Tips: पावसाळ्यात अंडरग्राउंड पार्किंगमध्ये पाणी साचतं? 'या' टिप्स फॉलो करा, गाड्या राहतील सुरक्षित
Jeans Home Decor: पायपुसणी ते वॉल हँगिंग, जुन्या डेनिम जीन्सपासून बनवा ५ सुंदर वस्तू