28 किमी मायलेज, 'या' SUV ला मोठी मागणी, विक्री दोन लाखांपार, तुमच्यासाठी फायद्याची माहिती

Published : Jan 17, 2026, 10:29 AM IST

Toyota Hyryder SUV : भारतात लॉन्च झाल्यापासून 40 महिन्यांच्या आत, टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडरने 200,000 युनिट्स विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. मारुती ग्रँड विटारावर आधारित असलेल्या या मिड-साईज एसयूव्हीला बाजारात मोठी मागणी आहे.  

PREV
15
टोयोटा हायरायडरची विक्रमी विक्री!

टोयोटाच्या या मिड-साईज एसयूव्हीने भारतीय बाजारात धुमाकूळ घातला आहे. लॉन्च झाल्यापासून अल्पावधीतच 2 लाखांहून अधिक ग्राहकांनी या गाडीवर विश्वास दाखवला आहे. बाजारात एसयूव्हीची जोरदार चर्चा होत आहे. 

25
मागणीत प्रचंड वाढ!
सुरुवातीला 50,000 युनिट्स विकायला 15 महिने लागले, पण आता मागणी इतकी वाढली आहे की फक्त 15 महिन्यांत 1 लाख गाड्या विकल्या गेल्या. हे या मॉडेलच्या लोकप्रियतेचे प्रतीक आहे.
35
आकर्षक डिझाइन आणि आधुनिक फीचर्स!

मजबूत आणि वेगळी ओळख, आरामदायक केबिन आणि अनेक आधुनिक वैशिष्ट्यांमुळे हायरायडर एक उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव देते. यामुळेच ती बाजारात वेगळी ठरत असून ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

45
खिशाला परवडणारी एसयूव्ही!

स्ट्रॉंग हायब्रीड तंत्रज्ञानामुळे ही एसयूव्ही उत्कृष्ट मायलेज देते. पेट्रोल आणि सीएनजी पर्यायांमध्येही ती उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना अनेक पर्याय मिळतात. टोयोटा हायरायडर 27.97 किमी/लिटरपर्यंतचे जबरदस्त मायलेज देते. 

55
तुमच्या बजेटमध्ये बसणारी एसयूव्ही!

बेस मॉडेलपासून ते टॉप मॉडेलपर्यंत, हायरायडर विविध किंमती आणि वैशिष्ट्यांसह 25 व्हेरिएंटमध्ये येते. यामुळे प्रत्येक ग्राहकाला आपल्या गरजेनुसार मॉडेल निवडता येते. यामध्ये टोयोटा हायरायडरची किंमत 12.73 लाखांपासून सुरू होत असून एकूण 25 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 

Read more Photos on

Recommended Stories