सध्या इलेक्ट्रिक वाहनांची (EV) मागणी तुफान वाढतेय. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत लोक ई-वाहनांना पसंती देत आहेत. गेल्या सप्टेंबर महिन्यातही इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या विक्रीत मोठी वाढ पाहायला मिळाली. पण यात सर्वात जास्त कोणती स्कूटर विकली गेलीये?
इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या मार्केटमध्ये टीव्हीएस (TVS), बजाज (Bajaj), विडा (Vida) आणि ओला (Ola) या कंपन्यांनी चांगलाच दबदबा निर्माण केलाय. गेल्या सप्टेंबर महिन्यातील विक्रीची आकडेवारी पाहिली, तर अपेक्षेपेक्षा जास्त स्कूटर्स विकल्या गेल्या आहेत. यात टीव्हीएसने पहिला क्रमांक पटकावलाय.
26
आकडेवारी काय सांगतेय?
पहिल्या नंबरवर असलेल्या टीव्हीएसने गेल्या सप्टेंबरमध्ये देशभरात एकूण ५४,०३७ युनिट्सची विक्री केलीये. गेल्या वर्षाशी तुलना केली तर यात १२५.८७ टक्क्यांची वाढ झालीये. टीव्हीएसची आयक्यूब (iQube) स्पोर्टी लूक आवडणाऱ्या तरुणांना जास्त आकर्षित करतेय, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय.
36
बजाज ऑटो (Bajaj Auto)
सप्टेंबर २०२६ मध्ये ४८,४२९ युनिट्स विकून बजाजने दुसरा क्रमांक मिळवलाय. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ १३८.८७% इतकी आहे. ग्राहकांनी बजाजच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरला चांगलीच पसंती दिलीये. चेतक प्रीमियम आणि चेतक अर्बन मॉडेल्स लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेत. बजेटमध्ये बसणारी किंमत आणि विश्वासार्ह क्वालिटी यामुळे ग्राहक याकडे वळत आहेत.
या यादीत तिसऱ्या नंबरवर एथर आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये कंपनीने ३०,५३३ युनिट्सची विक्री केलीये. कंपनीच्या विक्रीत दरवर्षी ५५.६२ टक्क्यांची स्थिर वाढ पाहायला मिळतेय.
56
हिरो विडा (Hero Vida)
हिरो मोटोकॉर्पचा इलेक्ट्रिक ब्रँड असलेल्या विडाने सप्टेंबर २०२६ मध्ये २४,३२१ युनिट्स विकले आहेत. गेल्या वर्षाशी तुलना केली तर कंपनीने ८३.२४ टक्क्यांची वाढ नोंदवलीये. ग्राहकांना विडा व्ही१ प्लस (Vida V1 Plus) आणि विडा व्ही१ प्रो (Vida V1 Pro) ही मॉडेल्स खूप आवडत आहेत.
66
ओला इलेक्ट्रिक (Ola Electric)
इतर कंपन्यांच्या तुलनेत ओला विक्रीच्या बाबतीत थोडी मागे पडलीये. गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांनी एकूण १३,४५१ इलेक्ट्रिक स्कूटर्स विकल्या आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात फक्त २.९६ टक्क्यांची वाढ झालीये. तरीही ओला एस१ एक्स सिरीज, ओला एस१ एअर आणि प्रीमियम फ्लॅगशिप ओला एस१ प्रो (जनरेशन २) या मॉडेल्सनी ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलंय.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .