Camera phones: भारी, महागडे फ्लॅगशिप फोन घेणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. पण जबरदस्त फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करायची इच्छा तर असतेच. काळजी करू नका, 50 हजारांपेक्षा कमी किमतीत येणारे काही बेस्ट कॅमेरा फोन्स कोणते आहेत ते पाहूया.
सॅमसंग गॅलेक्सी S24 मध्ये 50MP प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 50+10+12MP चे रियर कॅमेरे आणि सेल्फीसाठी 12MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 4,000 mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेटचा 6.2-इंचाचा डायनॅमिक LTPO AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 आणि एक्सिनोस 2400 प्रोसेसर पर्यायांमध्ये येतो. याची सुरुवातीची किंमत 41,994 रुपये आहे.
25
2. गुगल पिक्सल 10a
या लिस्टमध्ये गुगलचा लेटेस्ट पिक्सल 10a स्मार्टफोन एक उत्तम पर्याय आहे. यात 48MP मुख्य कॅमेरा आणि 13MP अल्ट्रावाइड लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 5,100 mAh बॅटरी, 6.3-इंचाचा अॅक्टुआ डिस्प्ले आणि टेन्सर G4 प्रोसेसर मिळतो. भारतात गुगल पिक्सल 10a ची सुरुवातीची किंमत 49, 999 रुपये आहे. फोनची प्री-ऑर्डर सुरू झाली असून 6 मार्चपासून याची अधिकृत विक्री सुरू होईल.
35
3. विवो वी60
विवो V60 हा 38, 999 रुपयांमध्ये मिळणारा एक जबरदस्त कॅमेरा फोन आहे. यात 50+50+8MP चा रियर कॅमेरा आणि तब्बल 50MP चा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 6,500 mAh बॅटरी, स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 चिपसेट आणि 90W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. याचा 6.77-इंचाचा HD+ अमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 5000 निट्स पीक ब्राइटनेससह येतो.
रियलमी 16 प्रो सुद्धा कॅमेरा फीचर्समुळे लक्ष वेधून घेतो. याची किंमत 31,999 रुपये आहे. याचा मुख्य कॅमेरा तब्बल 200MP चा आहे, जे याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. सोबत 8MP चा दुसरा रियर कॅमेरा आणि 50MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. यात 7,000 mAh बॅटरी, 80W फास्ट चार्जिंग, मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 मॅक्स प्रोसेसर आणि 144Hz रिफ्रेश रेट व 6500 निट्स पीक ब्राइटनेससह 6.8-इंचाचा अमोलेड डिस्प्ले आहे.
55
5. विवो वी60ई
या बजेटमध्ये विवो V60e हा देखील एक चांगला पर्याय आहे. यात 200+8MP चा रियर कॅमेरा सेटअप आणि 50MP चा सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 7360 टर्बो चिपसेटवर चालतो. यात 6.77-इंचाचा फुलएचडी+ अमोलेड डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 5000 निट्स पीक ब्राइटनेस आहे. फोनला 6,500 mAh बॅटरी आणि 90W वायर्ड फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .