मारुती सुझुकी सेलेरियोची एक्स-शोरूम किंमत ४.७० लाखांपासून सुरू होते. कमी बजेटमध्ये कार घेणाऱ्यांसाठी सेलेरियो नेहमीच एक उत्तम पर्याय आहे. पेट्रोल मॉडेल २६ किमी/लिटर मायलेज देते, तर सीएनजी मॉडेल ३४.४ किमी/किलो मायलेज देते. यामुळे ही देशातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या गाड्यांपैकी एक आहे. तिचा कॉम्पॅक्ट आकार, हलके स्टीयरिंग आणि मारुतीचे मोठे सर्व्हिस नेटवर्क यामुळे ही गाडी शहरात रोजच्या वापरासाठी उत्तम आहे.