आकर्षक डिझाइन, मायलेज आणि किंमत या तीन गोष्टी लक्षात घेऊन बाइक खरेदी करत असाल तर टीव्हीएस रेडिऑन हा एक चांगला पर्याय आहे. तिची किंमत ७४,०९४ रुपये (एक्स-शोरूम) आहे. १०९.७ सीसी इंजिन आहे. एका लिटर पेट्रोलवर शहरात तब्बल ७३.६८ किलोमीटर मायलेज देते, तर महामार्गांवर ६८.६ किलोमीटर मायलेज देते. डिस्क ब्रेक, यूएसबी चार्जिंग पॉइंट असे अनेक फीचर्स आहेत.