350cc बाईक म्हटलं की डोळ्यासमोर येते रॉयल एनफील्ड. पण बाजारात कमी किमतीतही अनेक जबरदस्त पर्याय आहेत. 1.38 लाखांपासून सुरू होणाऱ्या बेस्ट 350cc बाईक्सची ही यादी पाहा. या बाईक्स रोजच्या वापरासाठी आणि लॉंग राईडसाठीही एकदम परफेक्ट आहेत.
भारतात 350cc बाईक्सची क्रेझ तरुणांमध्ये खूप वाढली आहे. रोजच्या ऑफिस प्रवासासाठी आणि विकेंडला लाँग राईडसाठी, तरुण एकच बाईक वापरत आहेत. या बाईक्स स्टायलिश लूकसोबत आरामदायी प्रवास देतात. मायलेज आणि मेंटेनन्सचा खर्चही फारसा नसतो.
25
रॉयल एनफील्ड हंटर 350
रॉयल एनफील्ड हंटर 350 ही बाईक शहरात आणि लाँग राईडसाठी परफेक्ट आहे. ही क्लासिक 350 इतकी जड नाही. वजनाने हलकी आणि आकाराने लहान असल्यामुळे महिलाही ती सहज चालवू शकतात. तिची सुरुवातीची किंमत 1.38 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही बाईक 36 किमीचा मायलेज देते.
35
रॉयल एनफील्ड क्लासिक 350
रॉयल एनफील्डच्या बाईक्समध्ये क्लासिक 350 ची क्रेझच वेगळी आहे. विक्रीमध्ये या बाईकचा रेकॉर्ड आहे. तिची सुरुवातीची किंमत 1.81 लाख रुपये आहे, तर टॉप मॉडेलची किंमत 2.16 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. रोजच्या वापरासाठी आणि लॉंग राईडसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. ही बाईक 35 ते 40 किमीचा मायलेज देते.
होंडा H'ness सीबी 350 बाईक रॉयल एनफील्डला जोरदार टक्कर देत आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजीमुळे तिने बाजारात धुमाकूळ घातला आहे. तिची सुरुवातीची किंमत 1.93 लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेलची किंमत 1.98 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. स्लिपर क्लच, ब्लूटूथ आणि व्हायब्रेशन-फ्री इंजिन यांसारखे फीचर्स यात आहेत.
55
रॉयल एनफील्ड मीटिओर 350
रॉयल एनफील्डची मीटिओर 350 ही एका नव्या लूकमध्ये आलेली बाईक आहे. तिची किंमत 1.96 लाख ते 2.16 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. ही बाईक 40 किमीचा मायलेज देते. ही एक क्रूझर प्रकारची बाईक असून अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .