
Top 3 Budget Friendly Automatic Cars in India Under 7 Lakhs : भारतात, विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमधल्या ट्रॅफिकमध्ये रोज गाडी चालवणाऱ्यांसाठी ऑटोमॅटिक गाड्या आता पहिली पसंती बनत आहेत. या गाड्या चालवायला सोप्या असतात आणि सतत गिअर बदलण्याचा त्रास वाचतो, त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढतेय. पण ऑटोमॅटिक गाडी म्हणजे जास्त खर्च, असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. आज आम्ही तुम्हाला अशा तीन सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक गाड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही ४.७४ लाख ते ६.३१ लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) बजेटमध्ये सहज खरेदी करू शकता.
मारुतीच्या या हॅचबॅक गाडीचा हा सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक व्हेरिएंट आहे. यात ९९८ सीसी क्षमतेचं पेट्रोल इंजिन आहे, जे सुमारे ६५ bhp पॉवर निर्माण करतं. या ऑटोमॅटिक AMT व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ४,७४,९०० रुपयांपासून सुरू होते. ही गाडी एका लिटर पेट्रोलमध्ये २५.३ किलोमीटरपर्यंत मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे.
रेनॉच्या या गाडीत ९९९ सीसी क्षमतेचं १.०-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे ६९ bhp पॉवर देतं. याचा सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक व्हेरिएंट 'एव्होल्यूशन AMT' आहे. या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ४,९९,९०० रुपये आहे. ही गाडी एका लिटर पेट्रोलमध्ये २२.३ किलोमीटरपर्यंत मायलेज देते.
टाटा मोटर्सच्या या लोकप्रिय हॅचबॅक गाडीचा ऑटोमॅटिक व्हेरिएंट ६,३१,२९० रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत उपलब्ध आहे. यात १.२-लिटर (११९९ सीसी) क्षमतेचं पेट्रोल इंजिन आहे, जे ८६ bhp पॉवर निर्माण करतं. ही गाडी एका लिटर पेट्रोलमध्ये १९ किलोमीटरपर्यंत मायलेज देते.
एक गोष्ट लक्षात ठेवा की, वर दिलेल्या सर्व किंमती या एक्स-शोरूम आहेत. याचा अर्थ, यात आरटीओ (RTO), इन्शुरन्स आणि इतर खर्चांचा समावेश नाही. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये या गाड्यांच्या ऑन-रोड किंमतीत फरक असू शकतो.