सकाळच्या 'या' पाच सवयी वाढवतात मेंदूची कार्यक्षमता

Published : Dec 20, 2025, 12:16 PM IST
brain efficiency

सार

तुमची सकाळी कशी आहे, त्यानुसार तुमचा दिवसभराचा मूड तयार होतो. जर तुमच्या दिवसाची सुरुवातच आरोग्यदायी नसेल, तर संपूर्ण दिवस तसाच जातो. पण तुम्ही दिवसाची सुरुवात आरोग्यदायी पद्धतीने केली, तर तुम्ही दिवसभर उत्साही राहू शकता.

दिवसभराचा ताण घेऊन अनेक जण जगत असतात. रोज नवीन आव्हाने, नवीन अनुभवांना तर प्रत्येकजण सामोरा जात असतो. या अशा ताणतणावामुळे जीव मेटाकुटीला येतो. पण या रुटिनमध्ये आपण असे गुंतले आहोत की, या चक्रव्यूहातून बाहेर पडायला काही मार्गच नाही. विशेष म्हणजे, आपण आपली जीवनशैली बदलत चाललो आहोत. त्याचेही एकप्रकारे परिणाम होत आहेत. म्हणून आपणच काही जुन्या सवयी बदलण्याच्या तर, काही नव्याने स्वीकारण्याची गरज आहे. 

झोपेतून उठल्यानंतरचा पहिला तास तुमचा संपूर्ण दिवस चांगला किंवा वाईट बनवू शकतो. जर दिवसाची सुरुवातच आरोग्यदायी नसेल, तर संपूर्ण दिवस तसाच जातो. पण जर तुम्ही दिवसाची सुरुवात आरोग्यदायी पद्धतीने केली, तर तुम्ही दिवसभर उत्साही राहू शकता. या सवयी लावा.

1. पाणी प्या

झोपेतून उठल्याबरोबर भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. शरीरात थोडे जरी पाणी कमी झाले (डिहायड्रेशन) तरी त्याचा परिणाम मेंदूच्या कार्यावर होतो. सकाळी एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा.

2. सूर्यप्रकाश घ्या

सकाळी झोपेतून उठल्यानंतर सूर्यप्रकाश घेण्याचा प्रयत्न करा. किमान 10 मिनिटे तरी सूर्यप्रकाशात थांबावे. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश तुम्हाला अधिक ऊर्जा देण्यास आणि मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करतो.

3. व्यायाम करा

झोपेतून उठल्यानंतर शरीराला थोडा तरी व्यायाम द्या. किमान 10 मिनिटे चालण्याचा प्रयत्न करा.

4. पौष्टिक पदार्थांचे सेवन करा

सकाळचा नाश्ता पौष्टिक असावा. आहारात अंडी, नट्स, दही यांचा समावेश करा. हे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करते.

5. नियोजन करा

दिवसभरात करायच्या तीन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या कशा करायच्या याचे नियोजन करा. यामुळे तुम्हाला अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो सावधान! PM किसानचा हप्ता हवाय? मग 'हे' काम आजच पूर्ण करा!
Job Opportunities : परीक्षा नाही, थेट सरकारी नोकरीची संधी! Coal India मध्ये ट्रेनी भरती; अर्ज कसा करायचा?