Swapna Shastra: स्वप्नशास्त्रानुसार काही स्वप्नं भविष्याचे संकेत देतात. त्यामुळे स्वप्नांना हलक्यात घेऊ नका. जर तुम्हाला स्वप्नात या 5 गोष्टी दिसल्या, तर समजून जा की तुमच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत.
अनेकजण रात्री पडणाऱ्या स्वप्नांना फक्त कल्पना समजतात. पण प्राचीन स्वप्नशास्त्रानुसार, काही स्वप्नं भविष्यातील घटनांचे संकेत देतात. संपत्ती, यश, लग्न किंवा संकट अशा अनेक गोष्टींचे रहस्य स्वप्नांमध्ये दडलेलं असू शकतं. जाणून घेऊया कोणती स्वप्नं तुमचं नशीब बदलू शकतात.
26
स्वप्नात पाणी दिसण्याचा अर्थ
स्वप्नात स्वच्छ पाणी दिसणं खूप शुभ मानलं जातं. स्वप्नशास्त्रानुसार, हे मानसिक शांती, आर्थिक फायदा आणि नव्या संधींचं प्रतीक आहे. पण, जर तुम्हाला घाणेरडं पाणी दिसलं, तर सावध राहा. हे भविष्यात येणाऱ्या संकटाचं चिन्ह असू शकतं.
36
स्वप्नात साप दिसण्याचा अर्थ
स्वप्नात साप दिसणं नेहमीच अशुभ नसतं. शांत असलेला साप शक्ती आणि छुपे सामर्थ्य दर्शवतो. पण जर सापाने हल्ला केला, तर कुणीतरी तुमच्याविरोधात कट रचत असण्याची शक्यता आहे. हे स्वप्न तुम्हाला सावध राहण्याचा इशारा देतं.
जर तुम्ही स्वप्नात स्वतःला आकाशात उडताना पाहिलं, तर हे यश आणि प्रगतीचं लक्षण आहे. स्वप्नशास्त्र सांगतं की असं स्वप्न तुमच्या मार्गातील अडथळे दूर करतं आणि तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करता.
56
स्वप्नात सोनं किंवा दागिने सापडणे
स्वप्नात सोनं, अंगठी किंवा दागिने सापडणं हे आर्थिक लाभ आणि नाती घट्ट होण्याचे संकेत आहेत. हे स्वप्न लग्न किंवा एखादी चांगली बातमी मिळण्याचेही सूचक असू शकते. स्वप्नशास्त्र याला अत्यंत शुभ मानतं.
66
एकच स्वप्न पुन्हा पुन्हा पडणे
जर तुम्हाला एकच स्वप्न वारंवार पडत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वप्नशास्त्रानुसार, हे तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलाचं किंवा धोक्याच्या इशाऱ्याचं चिन्ह असू शकतं. अशा स्वप्नांचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .