येत्या 25 मार्च 2026 रोजी, बुधवारी सूर्य आणि शनी यांची युती होणार आहे. दोन्ही ग्रह 0 अंशावर एकत्र येतील. सूर्य आणि शनीची ही युती अनेक राशींसाठी नुकसानदायक ठरू शकते. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी.
26
मेष राशी
सूर्य-शनी युतीमुळे मेष राशीच्या लोकांना तणाव जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी तुमचे मतभेद होण्याची शक्यता आहे. वडिलांच्या आरोग्याची चिंता वाटेल. वादविवाद टाळा.
36
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जास्त ताण जाणवू शकतो. जे लोक भागीदारीत व्यवसाय करतात, त्यांना नुकसान होऊ शकतं. तुमच्या बोलण्यातील कठोरपणामुळे नाती बिघडू शकतात. वायफळ खर्च वाढू शकतो.
कन्या राशीच्या लोकांना शत्रूंकडून त्रास होऊ शकतो. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, नाहीतर नुकसान होऊ शकतं. कायदेशीर बाबींमध्ये कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.
56
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. कठोर मेहनत करा आणि त्याचं फळ मिळवा. कुटुंबात मालमत्तेवरून वाद निर्माण होऊ शकतात.
66
कुंभ राशी
कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. शनी सूर्यासोबत आल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तुमच्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. गाडी चालवताना काळजी घ्या.