Slimmest Smartphone : भारतीय स्मार्टफोन बाजारात टेक्नोने आपला नवीन मिड-रेंज स्मार्टफोन, पोवा कर्व्ह 2 (Tecno Pova Curve 2 5G) लाँच केला आहे. 8000mAh क्षमतेची दमदार बॅटरी असूनही, हा जगातला सर्वात स्लिम स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
फक्त 7.42mm जाडी असलेला टेक्नो पोवा कर्व्ह 2 5G फोन, मोठी बॅटरी आणि स्लिम डिझाइन या दोन्ही गोष्टी एकत्र आणतो. ज्यांना जास्त बॅटरी लाईफ हवी आहे, पण जाड फोन आवडत नाहीत, अशा ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून टेक्नोने हा फोन बाजारात आणला आहे. मिड-रेंज सेगमेंटमधील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपनीचं हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
25
डोळ्यांवर ताण कमी येतो
डिझाइनच्या बाबतीत टेक्नो पोवा कर्व्ह 2 5G ने एक वेगळाच दृष्टिकोन ठेवला आहे. अंतराळयानापासून प्रेरणा घेऊन तयार केलेलं याचं कर्व्हड् डिझाइन फोनला एक नवीन आणि प्रीमियम लूक देतं. यात 144Hz रिफ्रेश रेटचा कर्व्हड् अमोलेड डिस्प्ले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, यात असलेल्या आय-कम्फर्ट टेक्नॉलॉजीमुळे जास्त वेळ फोन वापरल्यावरही डोळ्यांवर ताण कमी येतो.
35
ट्रिपल चिपसेट कॉन्फिगरेशन
या फोनच्या हार्डवेअरबद्दल बोलायचं झाल्यास, यात मीडियाटेक D7100 प्रोसेसर वापरला आहे. कंपनीने याला 'ट्रिपल चिपसेट कॉन्फिगरेशन' असं नाव दिलं आहे. हा फोन 20 5G बँड्सना सपोर्ट करतो. तसेच, यात असलेलं इंटेलिजेंट नेटवर्क स्विचिंग सिस्टीम सर्व ठिकाणी स्थिर कनेक्टिव्हिटी देण्यास मदत करते.
टेक्नो पोवा कर्व्ह 2 मध्ये खास भारतीय ग्राहकांसाठी तयार केलेला ELLA AI 2.0 असिस्टंट आहे. हा असिस्टंट हिंदी, बंगाली, तमिळ, गुजराती आणि मराठीसारख्या भाषांना सपोर्ट करतो. यामुळे बोलताना अधिक नैसर्गिक अनुभव मिळतो. याशिवाय, AI आधारित नॉईज रिडक्शन टेक्नॉलॉजीमुळे आवाजाची गुणवत्ता उत्तम राहते, असा कंपनीचा दावा आहे.
55
फिचर्स
टेक्नो पोवा कर्व्ह 2 च्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 27,999 रुपये आहे, तर 8GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 29,999 रुपये आहे. हा फोन 20 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट आणि देशातील प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध होईल. निवडक बँका आणि NBFC पार्टनर्समार्फत यावर 3,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर्सही जाहीर करण्यात आल्या आहेत.