
Skoda Kodiaq RS Performance : झेक कार ब्रँड स्कोडाने कोडियाक RS भारतात जून 2026 मध्ये लॉन्च करणार असल्याची पुष्टी केली आहे. भारतीय बाजारपेठेतील झेक कार निर्मात्याची ही पहिली परफॉर्मन्स एसयूव्ही असेल. स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत, RS व्हर्जन अधिक स्पोर्टी दिसेल आणि यात अधिक शक्तिशाली TSI पेट्रोल इंजिन असेल.
CKD मार्गाने भारतात येणाऱ्या सामान्य कोडियाकच्या विपरीत, हे परफॉर्मन्स व्हर्जन CBU (कम्प्लिटली बिल्ट अप) युनिट म्हणून येण्याची शक्यता आहे. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 55 लाख ते 60 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. या किमतीत, कोडियाक RS आगामी MG मॅजेस्टर आणि फोक्सवॅगन टेरॉन आर-लाइनशी थेट स्पर्धा करेल.
पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, स्कोडा कोडियाक RS मध्ये 2.0L TSI पेट्रोल इंजिन वापरले जाईल, जे 7-स्पीड DCT (ड्युअल-क्लच ट्रान्समिशन) शी जोडलेले असेल. हे तेच इंजिन आहे जे पूर्वी स्कोडा ऑक्टाव्हिया RS मध्ये वापरले जात होते. हे इंजिन कमाल 265 bhp पॉवर आणि 400 Nm टॉर्क निर्माण करते, जे स्टँडर्ड कोडियाकपेक्षा 60 bhp अधिक शक्तिशाली आहे. ही परफॉर्मन्स एसयूव्ही AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) प्रणालीसह येईल.
कोडियाक RS फक्त 6.3 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रतितास वेग गाठते. आणि ही गाडी 231 किमी प्रतितास इतका कमाल वेग गाठू शकते. स्लॉटेड ब्रेक डिस्क आणि फ्रंट-एक्सलवर माउंट केलेले टू-पॉट कॅलिपर्स यांसारख्या अपग्रेडेड ब्रेकिंग घटकांमुळे तिचा परफॉर्मन्स आणखी सुधारेल. ग्लोबल-स्पेक मॉडेलमध्ये स्टँडर्ड म्हणून अॅडॉप्टिव्ह डॅम्पर्स मिळतात, परंतु इंडिया-स्पेक व्हर्जनमध्ये त्यांच्या उपलब्धतेची अद्याप पुष्टी झालेली नाही.
बाहेरच्या बाजूस, या परफॉर्मन्स एसयूव्हीमध्ये ब्लॅक-आउट ग्रिल, नवीन डिझाइनचा फ्रंट बंपर, ब्लॅक-आउट सी-पिलर आणि लाल ब्रेक कॅलिपर्ससह नवीन डिझाइन केलेले 20-इंच अलॉय व्हील्स असतील. ORVMs, रूफ रेल्स आणि विंडो फ्रेम्सवरील ब्लॅक-आउट ट्रीटमेंटमुळे तिचा स्पोर्टी लूक आणखी वाढेल.
कॅबिनमध्येही स्पोर्टी थीम कायम राहील. स्कोडा कोडियाक RS मध्ये कॉन्ट्रास्ट रेड स्टिचिंग आणि अॅक्सेंटसह ऑल-ब्लॅक कॅबिन थीम दिली जाईल. हेडरेस्टवर RS ब्रँडिंग असलेल्या बोल्स्टर्ड सीट्स तिला सामान्य कोडियाकपेक्षा अधिक वेगळे बनवतील.