Parenting: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत बिल गेट्स यांचे नाव नेहमीच आघाडीवर असते. पण त्यांच्या मते, खरी संपत्ती पैसा नाही, तर चांगली मूल्ये आणि जबाबदार जीवनशैली आहे. मुलांना महान बनवण्यासाठी त्यांनी सांगितलेले काही धडे आता पाहूया.
बिल गेट्स यांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. ते आपली संपूर्ण संपत्ती मुलांना देणार नाहीत. मुलांनी स्वतःच्या कष्टाने स्वतःची ओळख निर्माण करावी, अशी त्यांची इच्छा आहे. कष्टाने मिळवलेले यश व्यक्तिमत्त्व मजबूत करते आणि आयुष्यातील आव्हानांना तोंड देण्याचे धैर्य देते. सर्व काही सहज मिळाल्यास जीवनाचे मूल्य कळत नाही, असे गेट्स मानतात.
25
महागड्या वस्तूंपेक्षा अनुभव अधिक श्रेष्ठ
खरा आनंद चैनीच्या वस्तूंमध्ये नाही, हे बिल गेट्स यांनी आपल्या मुलांना शिकवले. प्रवास, नवीन गोष्टींबद्दल जाणून घेणे आणि वेगवेगळ्या लोकांशी ओळख झाल्यामुळे आयुष्याकडे व्यापक दृष्टीने पाहता येते. अनुभवातून माणसात संवेदनशीलता वाढते. आनंद ही विकत घेण्याची वस्तू नाही, हे त्यांनी मुलांना ठामपणे सांगितले.
35
पैसा हे ध्येय नाही…
बिल गेट्स यांच्या मते, पैसा जमा करणे हे जीवनाचे ध्येय नाही. समाजात बदल घडवण्यासाठी ते केवळ एक साधन आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हा विचार मुलांना कृतीत आणून दाखवला. ज्यांच्याकडे जास्त संसाधने आहेत, त्यांची समाजाप्रती जास्त जबाबदारी असते, असा त्यांचा विश्वास आहे.
45
सतत शिकत राहणे हेच खरे यश
बिल गेट्स हे आयुष्यभर शिकणारे व्यक्ती आहेत. हीच सवय त्यांनी आपल्या मुलांमध्येही रुजवली. जगातील गरिबी, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण समस्यांबद्दल जागरूकता असणे आवश्यक आहे, असे ते सांगतात. प्रश्न विचारणे, नवीन गोष्टी शिकणे आणि मोकळ्या मनाने विचार करणे मुलांना पुढे घेऊन जाते, असा त्यांचा विश्वास आहे.
55
विनम्रता आणि करुणा नसल्यास यश अपूर्ण
कितीही मोठ्या पदावर पोहोचलात तरी विनम्रता आवश्यक आहे, असे बिल गेट्स सांगतात. अहंकार माणसाला दूर करतो, तर करुणा माणसाला अधिक मानवी बनवते. इतरांच्या दुःखाबद्दल सहानुभूती न बाळगता मिळवलेले यश अर्थहीन आहे, असे ते मानतात. मुले कोणत्याही स्तरावर पोहोचली तरी त्यांनी चांगली माणसे बनावे, अशी त्यांची इच्छा आहे.