Relationship Psychology: प्रत्येक वेळी नवीन नात्यात आल्यावर वाटतं, 'यावेळी तरी योग्य व्यक्ती मिळाली'. पण काही दिवसांतच पुन्हा तेच वाद, भांडणं आणि दुःख! तुमच्यासोबतही असंच घडत असेल, तर हे नशीब नाही, तर यामागे मानसशास्त्र आहे.
सुरुवातीला प्रत्येक नातं छान वाटतं, पण काही दिवसांतच जुनी कहाणी पुन्हा सुरू होते. पार्टनरचं वागणं बदलतं, समजूतदारपणा कमी होतो आणि नातं तुटतं. तुमच्यासोबत हे वारंवार घडत असेल, तर हे तुमचं 'नशीब' नाही, तर तुमची मानसिकता आणि बालपणीचे अनुभव कारणीभूत आहेत, असं मानसशास्त्रज्ञ सांगतात.
25
गुंतागुंतीच्या नात्यांकडे ओढ का?
आपल्या लहानपणी घरात जसं वातावरण असतं, तीच आपल्या भविष्यातील नात्यांची 'ब्ल्यू प्रिंट' असते. आई-वडिलांमध्ये प्रेम आणि आदर पाहून वाढलेली मुलं, मोठ्यापणी पार्टनरमध्ये तेच गुण शोधतात. पण ज्यांनी लहानपणी सतत भांडणं किंवा प्रेमाची कमतरता पाहिली आहे, ते नकळतपणे अशाच गुंतागुंतीच्या नात्यांकडे ओढले जातात.
35
ओळखीच्या' भावनांचा शोध
आपलं मन नेहमी 'ओळखीच्या' भावना शोधत असतं. जर तुम्ही लहानपणी घरात सतत भांडणं, आरडाओरडा किंवा प्रेमाची कमतरता अनुभवली असेल, तर तुमच्या मेंदूला ते 'अशांत' वातावरणच नॉर्मल वाटू लागतं. त्यामुळे, मोठेपणी कोणी तुमच्याशी खूप प्रेमाने वागलं, तर ते तुम्हाला 'बोरिंग' किंवा विचित्र वाटू शकतं. तुमचं मन नकळतपणे पुन्हा तेच जुनं दुःख देणाऱ्या रागीट किंवा भावनाशून्य व्यक्तींकडे तुम्हाला खेचतं.
अनेकदा आपल्या मनात एक न्यूनगंड असतो, की 'मी खऱ्या प्रेमासाठी आणि आदरासाठी पात्र नाही'. या चुकीच्या भावनेमुळे, जे लोक आपल्याशी नीट वागत नाहीत, त्यांनाही आपण सहन करतो. हे एका दुष्टचक्रासारखं आहे; आधीच कमी असलेला आत्मविश्वास वाईट नात्याला जन्म देतो आणि ते नातं आपला स्वतःवरचा विश्वास आणखी कमी करतं, ज्यामुळे आपण पुन्हा चुकीच्या व्यक्तीकडेच आकर्षित होतो.
55
जुन्या नात्यांचं विश्लेषण करा
या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी, आधी तुमच्या जुन्या नात्यांचं विश्लेषण करा. तुम्ही कशा प्रकारच्या व्यक्ती निवडत आहात आणि कोणत्या चुका पुन्हा-पुन्हा होत आहेत, हे ओळखा. गरज वाटल्यास जवळच्या व्यक्तींची किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला आणि स्वतःचा आदर करायला शिकाल, तेव्हाच तुम्ही योग्य जोडीदार निवडू शकाल.