Relationship: लग्नानंतर नवरा-बायको हनिमूनला गेले, पण परत आल्यावर थेट घटस्फोटाची वेळ आली. झालं असं की नवऱ्याने हनिमूनला चक्क आई-वडील आणि नातेवाईकांनाही नेलं. आता समुपदेशकही चक्रावलेत की नक्की चूक कुणाची आहे.
घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या जोडप्यांना समुपदेशनासाठी बोलावलं जातं. अनेकदा समुपदेशनाने संसार वाचतात. पण या प्रकरणात नवरा आणि बायको, दोघांची बाजू ऐकल्यावर चूक कुणाची हे समुपदेशकालाही कळेनासं झालंय.
26
आणि बायकोने थेट घटस्फोटाचा अर्ज दिला
लग्नानंतर मोठ्या उत्साहात हनिमूनची योजना आखली. सुंदर ठिकाण, आलिशान हॉटेल, सगळं बुक झालं. पण हनिमूनवरून परत येताच घरात भांडणं सुरू झाली आणि बायकोने थेट घटस्फोटाचा अर्ज दिला. प्रकरण आता समुपदेशकाकडे आहे.
36
हनिमून नव्हे फॅमिली ट्रिप
हनिमूनला फक्त नवरा-बायको नव्हते. नवऱ्याने आई-वडील आणि नातेवाईकांच्या मुलांसकट सगळ्यांची तिकीटं बुक केली होती. 'मला नवऱ्यासोबत प्रायव्हेट वेळच मिळाला नाही, ही तर फॅमिली ट्रिप झाली,' असं म्हणत बायकोने घटस्फोटाचा अर्ज दिला.
नवऱ्याने सांगितलं, 'लग्नात आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी खूप मेहनत घेतली होती. तेही खूश राहावेत म्हणून मी सगळ्यांना सोबत नेलं. याचा असा परिणाम होईल, याचा मी विचारच केला नव्हता.'
56
बरोबर कोण? चूक कोण?
या प्रकरणात नवरा आणि बायको यांच्या विचारांमध्ये आणि वयामध्येही अंतर आहे. नवरा अधिक प्रॅक्टिकल विचार करत होता, तर बायकोला तिच्या आयुष्यातील खास क्षण जगायचे होते. समुपदेशकांच्या मते, दोघेही आपापल्या जागी बरोबरही आहेत आणि चूकही.
66
मोकळेपणाने संवाद साधला असता तर....
नवऱ्याने बायकोच्या भावनांचा आणि तिच्या अपेक्षांचा विचार करायला हवा होता. हनिमूनचा प्लॅन तिच्याशी बोलून ठरवायला हवा होता. दुसरीकडे, बायकोने थेट घटस्फोटाचा अर्ज देण्याऐवजी नवऱ्याशी बोलून त्याला तिची बाजू समजावून सांगायला हवी होती. मोकळेपणाने संवाद साधला असता तर कदाचित हे प्रकरण इतकं वाढलं नसतं.