Post Office vs Bank FD : पोस्ट ऑफिस की बँक एफडी? ५ वर्षांसाठी कुठे मिळेल जास्त व्याज?

Published : Nov 15, 2026, 11:20 AM IST

Post Office vs Bank FD : गुंतवणूक करताना जास्तीत जास्त परतावा आणि सुरक्षितता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. ५ वर्षांच्या कालावधीसाठी पोस्ट ऑफिस आणि बँक एफडीपैकी कुठे जास्त व्याज मिळेल?

PREV
15
५ वर्षांच्या गुंतवणुकीवर कुठे मिळेल सर्वाधिक व्याज?

गुंतवणूक सुरक्षित ठेवून चांगला परतावा मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिस आणि बँक एफडी हे लोकप्रिय पर्याय आहेत. ५ वर्षांसाठी गुंतवणूक करताना कुठे जास्त व्याज मिळेल, हे तपासायला हवे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या तिमाहीत केंद्र सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र, काही स्मॉल फायनान्स बँका सध्या एफडीवर आकर्षक व्याज देत आहेत.

25
पोस्ट ऑफिसच्या योजनांवर मिळणारे व्याज

सध्या पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वर ७.७ टक्के व्याज मिळत आहे. तर ५ वर्षांच्या मुदत ठेवीवर (TD) ७.५ टक्के व्याज दिले जाते. सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS) आणि सुकन्या समृद्धी योजनेवर सर्वाधिक ८.२ टक्के व्याज मिळते, मात्र यासाठी वयाची आणि पात्रतेची अट आहे. तसंच, पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमवर ७.४ टक्के व्याज मिळत आहे.

35
बँक एफडीवर ८.२५ टक्क्यांपर्यंत व्याज

बँक एफडीचा विचार केल्यास, सध्या स्मॉल फायनान्स बँका जास्त व्याज देत आहेत. नोव्हेंबर २०२६ च्या आकडेवारीनुसार, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सामान्य नागरिकांना ५ वर्षांच्या एफडीवर ८.२५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ८.६० टक्के व्याज देत आहे. उज्जीवन आणि उत्कर्ष यांसारख्या स्मॉल फायनान्स बँकाही ठराविक कालावधीच्या एफडीवर ८ टक्क्यांहून अधिक व्याज देत आहेत. पण, बँकेनुसार आणि कालावधीनुसार व्याजदर बदलू शकतात.

45
५ वर्षांच्या गुंतवणुकीत कोण पुढे?

केवळ ५ वर्षांचा विचार केल्यास, सूर्योदय बँकेची एफडी ८.२५ टक्के व्याजासह आघाडीवर आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिसची एनएससी (७.७ टक्के) आणि पाच वर्षांची मुदत ठेव (७.५ टक्के) यांचा क्रमांक लागतो. याचाच अर्थ सूर्योदय बँकेत एनएससीपेक्षा ०.५५ टक्के जास्त व्याज मिळत आहे. पण, निर्णय घेण्यापूर्वी केवळ व्याजदर न पाहता, व्याज मोजण्याची पद्धत, मुदतपूर्ती रक्कम, टॅक्स आणि मुदतीपूर्वी पैसे काढण्याचे नियम या सगळ्याची तुलना करणे गरजेचे आहे.

55
गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

फक्त जास्त व्याज मिळतेय म्हणून घाईघाईने कुठेही एफडी करू नका. हे व्याज ठराविक काळासाठीच आहे का, गुंतवणुकीवर काही मर्यादा आहे का, आणि मुदतीपूर्वी पैसे काढता येतील का, हे नक्की तपासा. पोस्ट ऑफिस आणि बँक एफडीचे नियम वेगळे असतात. बँक एफडीवर असणारी विमा सुरक्षा, कर आकारणी आणि तुमची गरज यांचाही विचार करा. परतावा, पैशांची उपलब्धता आणि सुरक्षितता या तिन्ही गोष्टींचा विचार करूनच योग्य निर्णय घ्या.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories