पोको X8 प्रो आयर्न मॅन एडिशन : नवा फोन लवकरच बाजारात; पाहा दमदार फीचर्स, किंमत

Published : Jan 26, 2026, 06:12 PM IST

पोको कंपनी मार्वेल सुपरहिरो आयर्न मॅन थीमसह नवीन “पोको X8 प्रो आयर्न मॅन एडिशन” स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा फोन लवकरच लाँच होणाऱ्या Redmi Turbo 5 ची रीब्रँडेड आवृत्ती असू शकते, असेही म्हटले जात आहे.

PREV
15
पोको X8 प्रो आयर्न मॅन एडिशन

पोकोच्या चाहत्यांसाठी एक मोठी सरप्राईज बातमी समोर आली आहे. पोको कंपनी मार्वेल सुपरहिरो आयर्न मॅन (Iron Man) थीमसह नवीन “पोको X8 प्रो आयर्न मॅन एडिशन” स्मार्टफोन तयार करत आहे. हा एक साधा मोबाईल नाही, तर कामगिरीसाठी एक 'शस्त्र' असेल, अशी चर्चा टेक विश्वात आहे. हा फोन नुकताच थायलंड NBTC सर्टिफिकेशन लिस्टमध्ये 24 जानेवारी 2026 रोजी दिसला आहे.

25
रेडमी टर्बो 5 चे रीब्रँडिंग

यामध्ये 2511FPC34G हा मॉडेल नंबर नमूद केला आहे. गेल्या वर्षी लाँच झालेल्या X7 Pro Iron Man Edition ला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे, पोको हे नवीन स्पेशल एडिशन मॉडेल आणत असल्याची माहिती आहे. हा मोबाईल चीनमध्ये लवकरच लाँच होणाऱ्या रेडमी टर्बो 5 ची रीब्रँडेड आवृत्ती असू शकतो, असेही म्हटले जात आहे.

35
पोको X8 प्रो डिस्प्ले

डिस्प्लेबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.67-इंचाचा 1.5K OLED स्क्रीन असण्याची शक्यता आहे. तसेच 144Hz रिफ्रेश रेट आणि 3,200 nits पीक ब्राइटनेसमुळे, उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसेल अशी अपेक्षा आहे. याशिवाय, यात IP68/IP69 वॉटर आणि डस्ट प्रोटेक्शन देखील असू शकते. परफॉर्मन्सला महत्त्व देणाऱ्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 8500 Ultra चिपसेट असेल.

45
पोको X8 प्रो बॅटरी

यामुळे गेमिंग आणि मल्टीटास्किंगमध्ये लॅग-फ्री अनुभव मिळेल. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, यात 50MP प्रायमरी + 8MP अल्ट्रा-वाइड + 32MP टेलीफोटो असा ट्रिपल कॅमेरा सेटअप असू शकतो. समोरच्या बाजूला 32MP कॅमेरा असण्याची शक्यता आहे. या स्पेशल एडिशनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बॅटरी. यात 5,500mAh ते 8,000mAh पर्यंत बॅटरी क्षमता असू शकते, असे म्हटले आहे.

55
पोको X8 प्रो किंमत

याशिवाय, 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळाल्यास, फोन कमी वेळेत चार्ज होईल. हा फोन Xiaomi HyperOS 2.0 वर चालू शकतो. भारतात 12GB रॅम + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सुमारे 45,990 रुपये असू शकते. तसेच, आयर्न मॅन बॉक्स + थीम्स + ॲक्सेसरीजमुळे याची किंमत सामान्य व्हेरिएंटपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. हा फोन भारतात फेब्रुवारी 2026 मध्ये लाँच होऊ शकतो.

Read more Photos on

Recommended Stories