PM Kisan Yojana 22th Installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार असून, ही रक्कम जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान जमा होण्याची शक्यताय. मात्र, सरकारने यावेळी 'फार्मर आयडी' अनिवार्य केला.
मुंबई : देशातील कोट्यवधी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरलेल्या 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' (PM-Kisan) योजनेच्या २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपण्याची चिन्हे आहेत. शेतीच्या कामांसाठी खते, बियाणे आणि औषधांच्या खरेदीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे हे २,००० रुपये लवकरच खात्यात जमा होणार आहेत. मात्र, केंद्र सरकारने यावेळी एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाची अट लागू केली आहे.
25
२२ वा हप्ता कधी येणार? (Expected Date)
केंद्र सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केली नसली तरी, योजनेच्या नियमानुसार दर चार महिन्यांनी हप्ता दिला जातो. त्यानुसार
संभाव्य वेळ: जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारी ते मार्च २०२६ दरम्यान.
बजेट कनेक्शन: साधारणपणे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
35
सावधान! 'Farmer ID' शिवाय पैसे मिळणार नाहीत
यावेळी केवळ ई-केवायसी (e-KYC) करून चालणार नाही. सरकारने पारदर्शकता वाढवण्यासाठी 'फार्मर आयडी' (Farmer ID) अनिवार्य केला आहे. का गरजेचा आहे फार्मर आयडी? अपात्र लाभार्थी, चुकीची माहिती आणि दुहेरी नोंदणी रोखण्यासाठी सरकारने हा युनिक ओळख क्रमांक लागू केला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे हा आयडी नसेल, त्यांचा हप्ता केंद्र सरकारकडून रोखला जाऊ शकतो.