
अचानक मोठा खर्च आला की आपल्यासमोर दोन सोपे पर्याय उभे राहतात - क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन. दोन्हीमधून पैसे लगेच मिळतात, पण त्यांची काम करण्याची पद्धत आणि परिणाम खूप वेगळे आहेत. व्याजदरातला फरक तर उघड दिसतो, पण व्याज कसं मोजलं जातं आणि परतफेडीचा कालावधी पाहिला की यातील मोठा फरक लक्षात येतो. चुकीचा निर्णय तुम्हाला कर्जाच्या दुष्टचक्रात अडकवू शकतो.
थोड्या काळासाठी किंवा छोट्या गरजांसाठी क्रेडिट कार्ड एक चांगला पर्याय आहे. तुम्ही वापरलेली रक्कम वेळेवर पूर्ण भरली, तर तुम्हाला व्याज लागत नाही, हा याचा सर्वात मोठा फायदा. पण एकदा का तुम्ही बिल भरायला चुकलात, की सगळं गणितच बदलतं. भारतात क्रेडिट कार्डवर वार्षिक ३० ते ४५ टक्के व्याज आकारलं जातं. आणि हे व्याज महिन्याला नाही, तर रोजच्या रोज लागतं. तुम्ही जेवढी रक्कम थकवली आहे, त्यावर चक्रवाढ व्याजाने रक्कम वाढतच जाते. अनेक जण 'मिनिमम ड्यू' (किमान देय रक्कम) भरून सुटकेचा निश्वास टाकतात, पण हा एक मोठा सापळा आहे. यामुळे तुमचं कर्ज कधीच फिटत नाही, उलट तुम्ही वर्षानुवर्षे कर्जदारच राहता. त्यामुळे, जर रक्कम लहान असेल आणि एक-दोन महिन्यांत परतफेड करण्याची खात्री असेल, तरच क्रेडिट कार्ड वापरा.
जर तुम्हाच्या तुलनेत पर्सनल लोनचे व्याजदर खूप कमी असतात. साधारणपणे हे दर १२ ते २० टक्क्यांपर्यंतला एकरकमी मोठी रक्कम हवी असेल आणि ती हप्त्यांमध्ये (EMI) परत फेडायची असेल, तर पर्सनल लोन हा एक चांगला मार्ग आहे. क्रेडिट कार्ड असतात. पर्सनल लोनमध्ये तुम्ही भरत असलेल्या प्रत्येक EMI मुळे तुमचं मुद्दल आणि व्याज दोन्ही कमी होत जातं. आपलं कर्ज कधी संपणार आहे, याची स्पष्ट कल्पना असल्याने मानसिक ताणही कमी असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, की पर्सनल लोन घेतल्यावर दर महिन्याला EMI वेळेवर भरावाच लागतो.
क्रेडिट कार्ड: अचानक आलेले छोटे खर्च, पुढच्या महिन्यात पगार झाल्यावर भरता येतील अशी ट्रॅव्हल बिलं, किंवा व्याजमुक्त EMI ऑफर्ससाठी क्रेडिट कार्ड वापरा.
पर्सनल लोन: दवाखान्याचा खर्च, घराची दुरुस्ती, लग्नकार्य किंवा जास्त व्याजाची इतर कर्जं फेडण्यासाठी पर्सनल लोन निवडा. जर परतफेडीला काही महिने लागणार असतील, तर पर्सनल लोन हाच फायदेशीर पर्याय आहे.
क्रेडिट कार्डची लिमिट पूर्ण वापरल्यास तुमच्या सिबिल स्कोअरवर वाईट परिणाम होऊ शकतो. याउलट, पर्सनल लोन घेतल्याने थेट स्कोअरवर परिणाम होत नाही. उलट, तुम्ही लोनचे हप्ते वेळेवर फेडल्यास तुमचा क्रेडिट इतिहास सुधारतो आणि स्कोअर वाढायला मदत होते.
कर्ज घेण्यापूर्वी स्वतःला दोन प्रश्न विचारा:
‘मला किती पैशांची गरज आहे’?
'मी किती दिवसांत हे पैसे परत करू शकेन'?
रक्कम लहान असेल तर क्रेडिट कार्ड ठीक आहे. पण परतफेडीला जास्त महिने लागणार असतील, तर पर्सनल लोन हाच शहाणपणाचा मार्ग आहे. लक्षात ठेवा, कमी काळासाठी मिळालेली सोय तुमच्यासाठी भविष्यात मोठी अडचण ठरू नये.