
आजकाल आपलं आयुष्य खूप डिजिटल झालंय. वेब सिरीज बघणं असो, एकामागोमाग एक ऑफिसच्या मिटिंग करणं असो किंवा मित्रांसोबत तासनतास गेम खेळणं असो, सगळीकडे आपल्याला एक चांगला ऑडिओ डिव्हाइस लागतोच. पण अडचण तेव्हा येते, जेव्हा ५,००० रुपयांच्या बजेटमध्ये एक प्रीमियम अनुभव देणारा ऑडिओ डिव्हाइस मिळत नाही.
पण आता ही अडचण दूर झाली आहे, कारण OPPO ने Enco Air5 Pro लाँच केला आहे. हा डिव्हाइस मनोरंजनासाठी आणि प्रवासासाठी एक उत्तम साथीदार आहे. OPPO Enco Air5 Pro हे ट्रू वायरलेस इअरबड्स (TWS) उत्तम ऑडिओ क्वालिटी, अत्याधुनिक नॉईज कॅन्सलेशन आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी यासाठी ओळखले जातात.
या OPPO Enco Air5 Pro ची किंमत फक्त ४,९९९ रुपये आहे. या किमतीत मिळणाऱ्या फीचर्समुळे हे सध्या भारतातील सर्वोत्तम TWS इअरबड्सपैकी एक आहेत. नॉईज कॅन्सलेशन, ऑडिओ क्वालिटी, कॉलिंग आणि बॅटरी लाईफ या सर्वच बाबतीत हे इअरबड्स सरस ठरतात. तुम्ही गर्दीच्या मेट्रोने प्रवास करत असाल, OTT वर सिरीज बघत असाल, एखाद्या गोंगाटाच्या कॅफेमध्ये बसला असाल, मोबाईलवर गेम खेळत असाल किंवा एकापाठोपाठ एक मिटिंग करत असाल, हे इअरबड्स तुमचा सर्वोत्तम साथीदार ठरतील.
रोजच्या गोंगाटाला करा बाय-बाय
आजकाल इअरबड्स घेताना प्रत्येकजण ऍक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (ANC) फीचर शोधतो. Enco Air5 Pro फक्त बाहेरचा आवाज कमी करत नाही, तर तुम्हाला एक शांत वातावरण देतं. यात 55dB ANC मिळतं, तेही 5000Hz अल्ट्रा-वाइड फ्रिक्वेन्सीवर. यापेक्षा जास्त किमतीच्या इअरबड्समध्येही हे फीचर मिळत नाही.
हे डिव्हाइस फक्त एक स्टॅटिक फिल्टर वापरत नाही, तर यात 'Adaptive Wind Noise Reduction' नावाचं एक खास फीचर आहे. त्यामुळे तुम्ही गाडी चालवत असाल, चालत असाल किंवा घराबाहेर असाल, तरी तुम्हाला स्पष्ट आवाज ऐकू येतो. वारा आणि आजूबाजूच्या आवाजाला हे फीचर प्रभावीपणे कमी करतं.
गेमिंग, OTT आणि म्युझिकसाठी एकदम परफेक्ट
Enco Air5 Pro मध्ये 12mm टायटॅनियम-कोटेड डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत. यामुळे बेस कंट्रोल चांगला राहतो, आवाजात गडबड कमी होते आणि हाय-फ्रिक्वेन्सीवरही स्पष्ट आवाज येतो. यामुळे तुम्ही संगीताचा प्रत्येक थर अनुभवू शकता. चित्रपट आणि शोजसाठी आवश्यक असलेला लो-एंड वेट आणि स्पेशल टेक्सचर यामुळे अगदी स्पष्टपणे जाणवतो.
याची साऊंड सिस्टीम मिड-रेंज क्लॅरिटी आणि दमदार बेस दोन्हीची खात्री देते. यात वेगवेगळे प्रीसेट्सही आहेत. यासाठी तुम्ही Hey Melody ॲपमधील Sound Master EQ वापरू शकता. बॅलन्स्ड आणि वाइड स्टेजसाठी 'Ultimate Sound', पॉडकास्ट आणि ॲकॉस्टिक संगीतासाठी 'Pure Vocals' आणि दमदार बेससाठी 'Thundering Bass' असे पर्याय आहेत. याशिवाय मॅन्युअल EQ कंट्रोल्सही मिळतात.
गेमिंगसाठी यात OPPO Alive Audio फीचर आहे. हे स्पेशल ऑडिओ अल्गोरिदम वापरून काम करतं. यामुळे गेम खेळताना आवाज कुठून येतोय, हे अगदी अचूक कळतं. 'Game Sound Effects' हे खास गेमिंगसाठी ऑप्टिमाइझ केले आहेत. याचे 12mm ड्रायव्हर्स हाय-रेस ऑडिओलाही सपोर्ट करतात, जे या किमतीत इतरत्र कुठेही मिळत नाही.
रोजच्या मल्टी-टास्किंगसाठी बनवलेले
Enco Air5 Pro ची रचना तुमच्या रोजच्या कामाच्या पद्धतीनुसार केली आहे. Spotify प्लेलिस्टवरून थेट कामाच्या कॉलवर, तिथून YouTube आणि मग BGMI वर जाणं अगदी सोपं होतं. यात कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 6.0 टेक्नॉलॉजी वापरली आहे, ज्यामुळे कनेक्शन जलद आणि स्थिर राहतं. मल्टी-डिव्हाइस वापरासाठी 'Dual-Connect' फीचर आहे. यामुळे तुम्ही अँड्रॉइड, iOS किंवा विंडोज डिव्हाइसमध्ये सहज स्विच करू शकता. पुन्हा-पुन्हा मॅन्युअली पेअर करण्याची गरज नाही. लॅपटॉपवर काम करताना फोनवर आलेले कॉल्स घेण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे.
'ट्रिपल माइक एआय कॉल नॉईज रिडक्शन' हे आणखी एक महत्त्वाचं फीचर आहे. यामुळे तुमचा आवाज समोरच्या व्यक्तीला अगदी स्पष्ट आणि स्थिर ऐकू जातो. ओप्पोने ताशी २५ किलोमीटर वेगाच्या वाऱ्यातही याची चाचणी केली आहे. एआय प्रोसेसिंगमुळे बोलणाऱ्याचा आवाज कमी होत नाही आणि आवाजाची पातळी स्थिर राहते.
यात एक एआय ट्रान्सलेशन फीचरसुद्धा आहे. वन-साइडेड कॉल्ससाठी लाइव्ह ट्रान्सलेशन वापरता येतं, तर फेस-टू-फेस ट्रान्सलेशनमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्यानुसार भाषांतर होतं.
दीर्घकाळ टिकणारी बॅटरी
इअरबड्स वापरणाऱ्यांची सर्वात मोठी चिंता बॅटरीची असते. पण यावर उपाय म्हणून हे इअरबड्स एकदा पूर्ण चार्ज केल्यावर तब्बल ५४ तासांची बॅटरी लाईफ देतात. तुम्ही रोज ३-४ तास वापरल्यास हे दोन आठवडे सहज चालतील. विशेष म्हणजे, फक्त १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ४ तासांपर्यंतचा प्लेबॅक मिळतो.
बॅटरीच्या आरोग्याचीही काळजी घेण्यात आली आहे. हे इअरबड्स १००० चार्जिंग सायकलपर्यंत टिकतात, म्हणजेच जवळपास पाच वर्षांपर्यंत चार्जिंग परफॉर्मन्समध्ये कोणतीही घट होणार नाही.
याशिवाय, याला IP55 रेटिंग आहे, म्हणजेच हे धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहेत. प्रत्येक इअरबडचं वजन फक्त ४.४ ग्रॅम आहे.
दिवसभराचा साथीदार
OPPO Enco Air5 Pro हा एक असा डिव्हाइस आहे, जो मनोरंजन, ANC परफॉर्मन्स आणि आरामदायी वापर यांचा उत्तम मिलाफ आहे. काम, प्रवास, गेमिंग, स्ट्रीमिंग अशा सगळ्या गोष्टींसाठी हा एक परफेक्ट पर्याय आहे.
४,९९९ रुपयांच्या किमतीत, 55dB ANC, 12mm टायटॅनियम ड्रायव्हर, ब्लूटूथ 6.0, ड्युअल कनेक्ट, ट्रिपल माइक एआय क्लॅरिटी, ५४ तासांची बॅटरी, १० मिनिटांत फास्ट चार्जिंग आणि IP55 रेटेड डिझाइन यांसारख्या फीचर्समुळे हे आज भारतातील सर्वोत्तम TWS पॅकेजपैकी एक आहे.
ओप्पो एन्को एअर5 प्रो आता फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि ओप्पो ई-स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.