Numerology: आपल्या आयुष्यात आपण अनेक लोकांना भेटतो, पण प्रत्येकाचा स्वभाव सारखा नसतो. काही विशिष्ट मूलांकात जन्मलेले लोक आपल्या स्वाभिमानाला धक्का लागल्यास कधीच गप्प बसत नाहीत. जर तुम्ही त्यांच्या नजरेतून उतरलात, तर ते आयुष्यभर लक्षात ठेवतात.
अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेवरून (Birth Numbers) त्याचा स्वभाव ओळखता येतो. काही विशिष्ट मूलांकाच्या लोकांच्या अहंकाराला (Ego) धक्का लागल्यास किंवा कोणी त्यांचं मन दुखावल्यास, ते कधीच माफ करत नाहीत. अशा तीन मुख्य मूलांकांबद्दल जाणून घेऊया.
24
मूलांक 1 (कोणत्याही महिन्याची 1, 10, 19 किंवा 28 तारीख)
या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. सूर्याच्या प्रभावामुळे हे लोक खूप स्वाभिमानी असतात. त्यांच्या अहंकाराला धक्का लागल्यास ते कुणाचंच ऐकत नाहीत. जर कोणी त्यांचं मन मोडलं, तर ते त्या व्यक्तीला आयुष्यभर शत्रू मानतात किंवा त्यांच्याशी बोलणंच बंद करतात. हे लोक कोणताही विषय मनात न ठेवता थेट तोंडावर बोलतात.
34
मूलांक 8 (कोणत्याही महिन्याची 8, 17 किंवा 26 तारीख)
या मूलांकाचा स्वामी शनि आहे. शनीच्या प्रभावामुळे हे लोक खूप मेहनती आणि गंभीर स्वभावाचे असतात. यांना गर्दी फारशी आवडत नाही. यांच्यामध्ये संयम (patience) खूप असतो. पण एकदा का कोणी यांना जास्त त्रास दिला, तर ते त्या व्यक्तीला आयुष्यभर विसरत नाहीत. एकदा त्यांच्या नजरेतून उतरल्यावर पुन्हा त्यांच्या मनात स्थान मिळवणं अशक्य असतं.
मूलांक 9 (कोणत्याही महिन्याची 9, 18 किंवा 27 तारीख)
या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. मंगळाच्या प्रभावामुळे हे लोक प्रचंड ऊर्जावान (High Energy) असतात. यांना कशाचीही भीती वाटत नाही आणि ते धोका पत्करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. यांना स्वतःबद्दल चुकीचं बोललेलं आवडत नाही. विधायक टीका स्वीकारतात, पण अपमान सहन करत नाहीत. जर कोणी मुद्दामहून यांना खाली खेचण्याचा प्रयत्न केला, तर हे न घाबरता सडेतोड उत्तर देतात आणि अशा लोकांपासून कायमचे दूर होतात.