
Tata Tiago EV तुम्ही नवीन इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. टाटा मोटर्स आपली लोकप्रिय इलेक्ट्रिक हॅचबॅक 'टाटा टियागो ईव्ही' एका नवीन आणि सुधारित रूपात लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, या अपडेटेड मॉडेलची चाचणी सुरू झाली आहे. ही नवीन गाडी 2026 च्या दुसऱ्या सहामाहीत बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. यावेळी कंपनीने गाडीचा लूक अधिक आधुनिक करण्यावर आणि तिची रेंज वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.
नवीन टियागो ईव्हीचं डिझाइन अधिक आकर्षक आणि मॉडर्न असेल. गाडीच्या पुढच्या बाजूला, सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त बारीक आणि शार्प हेडलाइट्स मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वात मोठा बदल म्हणजे एलईडी डीआरएल (DRL), जे आता बंपरऐवजी थेट हेडलाइट्सच्या आतमध्ये दिले जातील. गाडीला अधिक स्टायलिश लूक देण्यासाठी पुढची ग्रील आणि बंपर पुन्हा डिझाइन केलं जाईल.
Tata Tiago EV गाडीच्या बाजूला आणि मागच्या डिझाइनमध्येही बदल केले जातील. चाचणी मॉडेलमध्ये नवीन डिझाइनचे अलॉय व्हील्स दिसले आहेत, जे गाडीची रेंज सुधारण्यास मदत करतील. मागच्या बाजूला कनेक्टेड टेललाइट्स मिळण्याची शक्यता आहे, जो आजकालच्या नवीन गाड्यांमध्ये दिसणारा एक ट्रेंड आहे. यामुळे रात्रीच्या वेळी गाडीला अधिक प्रीमियम आणि स्पोर्टी लूक मिळतो. टेलगेट आणि मागच्या बंपरलाही नवीन आकार दिला जाऊ शकतो.
Tata Tiago EV पॉवर आणि बॅटरीबद्दल बोलायचं झाल्यास, कंपनी नवीन '6-इन-1 इलेक्ट्रिक ड्राइव्ह' टेक्नॉलॉजी वापरू शकते. ही सिस्टीम गाडीचं वजन कमी करण्यास आणि परफॉर्मन्स सुधारण्यास मदत करते. सध्या टियागो ईव्हीमध्ये 19.2kWh आणि 24kWh क्षमतेचे बॅटरी पॅक मिळतात. पण नवीन मॉडेलमध्ये यापेक्षा मोठी किंवा अधिक शक्तिशाली बॅटरी दिली जाऊ शकते. यामुळे गाडी एका चार्जमध्ये जास्त अंतर कापेल.