
मुंबई : रेनॉल्ट इंडियाने (Renault India) भारतीय मार्केटमध्ये आपली नवीन कार Renault Duster Strong Hybrid E-Tech 160 लाँच केली आहे. कंपनीने या एसयूव्हीसोबत पहिल्यांदाच आपली स्ट्रॉंग हायब्रिड टेक्नॉलॉजी आणली आहे. ही कार ग्राहकांना Evolution, Techno आणि Emotion अशा तीन व्हेरियंटमध्ये मिळणार आहे. भारतात इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रेनॉल्टने ही नवीन डस्टर मार्केटमध्ये आणली आहे. बेस्ट परफॉर्मन्ससोबतच जास्तीत जास्त मायलेज देण्याच्या उद्देशाने ही डस्टर डिझाइन केली आहे.
Renault Duster Strong Hybrid E-Tech 160 कारमध्ये 1.8 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन, दोन इलेक्ट्रिक मोटर्स आणि 1.4 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. हे संपूर्ण सिस्टीम मिळून 160 PS पॉवर जनरेट करते. या एसयूव्हीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हिला चार्ज करण्यासाठी कोणत्याही वेगळ्या चार्जिंग स्टेशनची किंवा प्लगची गरज नाही.
ही कार प्लग-इन हायब्रिड कारपेक्षा वेगळी आहे. गाडी चालवतानाच तिची बॅटरी ऑटोमॅटिक चार्ज होते. ब्रेक लावताना आणि गाडी चालवताना निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर करून बॅटरी चार्ज केली जाते. या सिस्टीममुळे चालकांना इलेक्ट्रिक आणि पेट्रोल अशा दोन्ही तंत्रज्ञानाचा फायदा मिळतो.
नवीन Duster Strong Hybrid E-Tech 160 कार 29 kmpl चे ARAI प्रमाणित मायलेज देते, असा दावा रेनॉल्टने केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, शहरातील रोजच्या प्रवासातील 80% प्रवास तुम्ही फक्त इलेक्ट्रिक मोडवर करू शकता. ही सिस्टीम पेट्रोलचा वापर कमी करण्यात खूप मदत करते.
या कारमध्ये फॉर्म्युला 1 (Formula 1) इन्स्पायर्ड मल्टी-मोड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (Multi-mode automatic transmission) दिले आहे. या एसयूव्हीमध्ये दोन इलेक्ट्रिक गिअर्स आणि चार पेट्रोल गिअर्स आहेत. डिझेल कारच्या तुलनेत ही कार 29% पर्यंत इंधनाची बचत करू शकते.
Evolution Strong Hybrid E-Tech 160: 16.99 लाख रुपये
Techno Strong Hybrid E-Tech 160: 18.99 लाख रुपये
Emotion Strong Hybrid E-Tech 160: 19.49 लाख रुपये