
never eat these 17 fishes crab prawns bad for your health : मासे खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, परंतु सर्वच मासे शरीरासाठी पोषक नसतात. तुम्ही कोणत्या प्रकारचे मासे निवडता, यावर ते तुमच्यासाठी 'सुपरफूड' ठरणार की 'विषारी आहार', हे अवलंबून असते. सध्याच्या काळात प्रदूषण, खाणींमधून निघणारे सांडपाणी आणि प्लॅस्टिक यामुळे समुद्राच्या आणि गोड्या पाण्यातील माशांमध्ये पारा आणि PFAS (फॉरएव्हर केमिकल्स) सारखी घातक रसायने साचत आहेत.
२०२३ च्या एका अभ्यासानुसार, एक गोड्या पाण्यातील मासा खाणे म्हणजे महिनाभर प्रदूषित पाणी पिण्यासारखे आहे. म्हणूनच, आरोग्याच्या दृष्टीने खालील १७ प्रकारचे मासे खाणे टाळले पाहिजे.
अनेकांना वाटतं तिलापिया आरोग्यदायी आहे, पण अभ्यासानुसार हा मासा खाणे बेकन खाण्यापेक्षाही घातक ठरू शकते. यात ओमेगा-३ चे प्रमाण खूप कमी आणि जळजळ वाढवणाऱ्या ओमेगा-६ फॅटी ॲसिडचे प्रमाण जास्त असते. यामुळे हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो. चीनमधून आयात केलेला तिलापिया तर पूर्णपणे टाळावा.
अतिमासेमारीमुळे हा मासा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जर तुम्ही 'कॉड लिव्हर ऑईल' घेत असाल, तर ते अटलांटिक कॉडपासून बनवलेले नाही याची खात्री करा. त्याऐवजी अलास्कन कॉडचा पर्याय निवडा.
हे मासे जास्त प्रदूषित असतात. तसेच, हे मासे पकडताना मोठ्या प्रमाणात इतर समुद्री जीवांची हत्या होते, ज्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते.
बेलुगा स्टर्जन माशांच्या अंड्यांपासून कॅविअर बनवले जाते. हे मासे १०० वर्षांपर्यंत जगू शकतात, पण सध्या ते अत्यंत दुर्मिळ झाले आहेत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी हे खाणे टाळावे.
या माशात पाऱ्याचे प्रमाण खूप जास्त असते. तसेच अतिमासेमारीमुळे यांची संख्या झपाट्याने घटत आहे.
ईल मासे पर्यावरणासाठी नैसर्गिक फिल्टर म्हणून काम करतात. मात्र, हे मासे घातक रसायने शोषून घेतात. काही देशांत हे मासे इतके विषारी झाले आहेत की वर्षातून एकदाच ते खाण्याचा सल्ला दिला जातो.
बाजारात मिळणारे बहुतेक 'अटलांटिक साल्मन' हे फार्ममध्ये वाढवलेले असतात. या माशांना अँटीबायोटिक्स आणि कीटकनाशके दिली जातात, जी मानवी शरीरासाठी कर्करोग आणि लठ्ठपणाला निमंत्रण देऊ शकतात. त्याऐवजी 'वाइल्ड-कॉट' साल्मन निवडा.
हॉटेल्समध्ये 'कॅटफिश' म्हणून विकला जाणारा हा मासा अनेकदा व्हिब्रिओ बॅक्टेरियाने दूषित असतो. हे मासे अत्यंत अस्वच्छ पाण्यात वाढवले जातात आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात रसायने वापरली जातात.
बाजारातील ९०% कोळंबी फार्ममधील असते. यामध्ये रंगासाठी वापरलेली रसायने पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता कमी करू शकतात आणि महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.
रशियातून आयात केलेले किंग क्रॅब अनेकदा चुकीच्या पद्धतीने पकडले जातात. त्याऐवजी अलास्कन किंग क्रॅबची खात्री करूनच खरेदी करा.
हे मासे १५० वर्षांपर्यंत जगतात आणि उशिरा प्रजनन करतात. त्यामुळे यांची संख्या वाढायला वेळ लागतो. यात पाऱ्याचे प्रमाणही जास्त असते.
शार्क अन्नसाखळीत वरच्या स्थानी असल्यामुळे त्यांच्या शरीरात पाऱ्याचे प्रमाण सर्वाधिक असते. तसेच शार्कच्या अनेक प्रजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
सुशी प्रेमींमध्ये हा लोकप्रिय आहे, पण हा मासा आता केवळ २.६% उरला आहे. यात पाऱ्याचे प्रमाणही धोकादायक असते.
पाऱ्याच्या उच्च प्रमाणामुळे महिला आणि मुलांनी हा मासा अजिबात खाऊ नये, असा सल्ला दिला जातो.
मॅकेरलमध्ये ओमेगा-३ असते, पण 'किंग मॅकेरल'मध्ये पाऱ्याचे प्रमाण जास्त असते. त्याऐवजी अटलांटिक मॅकेरल हा सुरक्षित पर्याय आहे.
यात पाऱ्याचे मध्यम प्रमाण असते. अनेकदा ग्रुपरच्या नावाखाली स्वस्त बासा मासा विकून ग्राहकांची फसवणूक केली जाते.
या माशांच्या सर्व प्रजाती सध्या धोक्यात आहेत. हे मासे खाणे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहे.
मासे खरेदी करताना ते कोठून आले आहेत आणि ते कसे पकडले गेले आहेत, याची माहिती घेणे आवश्यक आहे. आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी नेहमी वाइल्ड-कॉट आणि कमी प्रदूषित माशांची निवड करा.