Motorola Edge 70 Neo : फक्त 8.49mm जाडी आणि 7,000mAh ची बॅटरी; मोटोरोलाचा नवा फोन बाजारात

Published : Oct 27, 2026, 05:10 PM IST

मोटोरोलाने 7,000mAh ची महाकाय बॅटरी असलेला फोन आणलाय, तोही फक्त 8.49mm जाडीत! स्नॅपड्रॅगन 7s जेन 3 प्रोसेसर आणि सोनी कॅमेरा असलेल्या मोटोरोला एज 70 निओचे सर्व फीचर्स…

PREV
14
7,000mAh बॅटरीसह मोटोरोला एज 70 निओ!

जास्त काळ टिकणारी बॅटरी हवी असलेल्या युजर्ससाठी मोटोरोला आपला नवा 'मोटोरोला एज 70 निओ' भारतात लाँच करणार आहे. याबद्दलची महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.

मोठी बॅटरी असलेले फोन सहसा जाड असतात, पण मोटोरोलाने हा समज मोडलाय. या फोनची जाडी फक्त 8.49mm आणि वजन 204 ग्रॅम आहे. यात 7,000mAh ची मोठी बॅटरी दिलीय. बाजारात इतर कंपन्या 67W किंवा त्याहून अधिक फास्ट चार्जिंग देतात, पण यात फक्त 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. त्यामुळे फोन फुल चार्ज व्हायला थोडा जास्त वेळ लागू शकतो.

24
1.5K AMOLED स्क्रीन आणि कॅमेरा

या फोनमध्ये 6.78-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले दिलाय. स्मूथ एक्सपिरियन्ससाठी 144Hz रिफ्रेश रेट आणि सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i चं प्रोटेक्शन मिळतं. फोटोग्राफीसाठी 50MP चा Sony LYTIA 710 सेन्सर (f/1.8 अपर्चर आणि 3-इन-1 लाईट सेन्सरसह) आहे, जो कमी प्रकाशातही उत्तम फोटो काढतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा दिलाय. यात टेलिफोटो लेन्स नाही, त्याऐवजी फक्त 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो.

34
प्रोसेसर, मेमरी आणि सॉफ्टवेअर

नथिंग फोन (3a) आणि रेडमी नोट 14 प्रो+ प्रमाणेच यात स्नॅपड्रॅगन 7s जेन 3 (Snapdragon 7s Gen 3) प्रोसेसर दिलाय. रोजच्या वापरासाठी आणि मल्टीटास्किंगसाठी हा एकदम बेस्ट आहे. यात LPDDR5X रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज मिळतं. हा फोन थेट अँड्रॉइड 16 वर चालेल. मोटोरोला या फोनसोबत 4 अँड्रॉइड OS अपडेट्स आणि 5 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देणार आहे. तसेच, धूळ आणि पाण्यापासून बचावासाठी याला IP64 रेटिंग मिळालंय.

44
डिझाईन, कलर्स आणि मार्केट

सप्टेंबरमध्ये बर्लिनमध्ये झालेल्या IFA इव्हेंटमध्ये मोटोरोलाने या फोनची घोषणा केली होती. याआधीचा एज 60 निओ (6.36-इंच स्क्रीन, 5,200mAh बॅटरी) भारतात आला नव्हता, पण आता मोठी स्क्रीन आणि दमदार बॅटरी आवडणाऱ्या भारतीय युजर्ससाठी हा नवा मॉडेल येत आहे. हा फोन माउंटेन व्ह्यू (Mountain View), मिल्की ब्लू (Milky Blue), सेज (Sage) आणि ग्रे लिलाक (Grey Lilac) या चार आकर्षक पँटोन कलर्समध्ये उपलब्ध होईल.

कॅमेरा आणि प्रोसेसरच्या बाबतीत हा फोन इतर कंपन्यांना कशी टक्कर देतो आणि मोटोरोला याची किंमत काय ठेवते, यावरच या फोनचं यश अवलंबून असेल असं टेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories