Home Look तुमच्या घराच्या पुढच्या भिंतीला एकदम भारी, लक्झरी लुक द्यायचा आहे का? सध्या कोणते फ्रंट वॉल डिझाइन्स ट्रेंडमध्ये आहेत? स्टोन क्लेडिंग, 3D पॅनल, व्हर्टिकल स्लॅट्स आणि LED लायटिंगसारख्या जबरदस्त आयडियाजवर एक नजर टाका.
Wall Design घराची पुढची भिंतच लोकांचं लक्ष वेधून घेते, त्यामुळे ती आकर्षक आणि मॉडर्न असणं खूप गरजेचं आहे. आजकाल फक्त मजबूत भिंत बांधून चालत नाही, तर तिला असं डिझाइन करण्याचा ट्रेंड आला आहे, ज्यामुळे संपूर्ण घराला एक प्रीमियम आणि लक्झरी लुक मिळतो. तुम्ही नवीन घर बांधत असाल किंवा जुन्या घराला नवा लुक देण्याचा विचार करत असाल, तर या काही मॉडर्न फ्रंट वॉल डिझाइन आयडियाज नक्कीच तुमच्या घराला स्टायलिश बनवतील.
26
स्टोन क्लॅडिंगने द्या रॉयल लुक
नैसर्गिक दगड किंवा स्टोन क्लेडिंग वापरल्याने पुढच्या भिंतीला एक क्लासी आणि प्रीमियम लुक मिळतो. ग्रे, बेज आणि सँडस्टोनसारखे रंग मॉडर्न घरांवर खूपच आकर्षक दिसतात. हे डिझाइन जास्त काळ टिकतं आणि याला मेंटेनन्सची गरजही कमी असते.
36
व्हर्टिकल स्लॅट्सने बनवा मॉडर्न एलिव्हेशन
आजकाल लाकडी किंवा मेटलचे व्हर्टिकल स्लॅट्स फ्रंट वॉल डिझाइनमध्ये खूप ट्रेंडिंग आहेत. यामुळे भिंतीला एक युनिक टेक्सचर मिळतं आणि घराची उंचीही जास्त वाटते. न्यूट्रल रंगांसोबत यांचा वापर केल्यास संपूर्ण फ्रंट एरिया खूपच सुंदर दिसतो.
जर पुढच्या भिंतीवर वॉर्म LED लाइट्स किंवा वॉल वॉशर लाइट्स लावल्या, तर रात्रीच्या वेळी घराचा लुक कित्येक पटींनी अधिक आकर्षक दिसतो. योग्य लायटिंगमुळे साधं डिझाइनसुद्धा लक्झरी वाटतं आणि घराची एन्ट्री खास बनते.
56
टेक्सचर्ड पेंट आणि 3डी पॅनलचा करा वापर
साध्या पेंटऐवजी टेक्सचर्ड फिनिश किंवा 3D वॉल पॅनल लावल्याने पुढच्या भिंतीला एक वेगळीच खोली आणि स्टाईल मिळते. हे डिझाइन मॉडर्न आर्किटेक्चरसोबत सहज जुळतं आणि कमी बजेटमध्येही मोठा बदल घडवून आणू शकतं.
66
ग्रीन वॉल आणि मेटल एक्सेंट्सचं कॉम्बिनेशन
नैसर्गिक हिरवळ आणि काळ्या किंवा सोनेरी रंगाच्या मेटल एक्सेंट्सचं मिश्रण पुढच्या भिंतीला एक युनिक आणि प्रीमियम लुक देतं. छोटे प्लांटर्स, व्हर्टिकल गार्डन किंवा सजावटी मेटल स्क्रीन लावल्याने घराचा बाहेरील भाग आकर्षणाचा केंद्रबिंदू बनतो.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .