Mobile Market: आता Realme, OnePlus चे ही फोन महागले; नवी किंमत जाणून घ्या!

Published : May 19, 2026, 09:21 PM IST

Mobile Market: Realme, OnePlus, Poco आणि Lava कंपन्यांनी भारतात आपल्या महत्त्वाच्या स्मार्टफोन मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. मेमरी चिपचा तुटवडा आणि वाढलेला उत्पादन खर्च हे यामागील मुख्य कारण असल्याचं सांगितलं जातंय.

PREV
14
स्मार्टफोनची दरवाढ
भारतात स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. 'अजून काही दिवस थांबून घेऊ' असा विचार करणाऱ्यांना मोबाईल कंपन्यांनी मोठा धक्का दिला आहे. Realme, OnePlus, Poco आणि Lava यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सनी आपल्या प्रमुख मॉडेल्सच्या किमती पुन्हा वाढवल्या आहेत. या दरवाढीमागे जागतिक स्तरावर मेमरी चिप्सचा तुटवडा हे मुख्य कारण आहे. DRAM आणि NAND सारख्या महत्त्वाच्या स्टोरेज चिप्सच्या किमती वाढल्यामुळे स्मार्टफोनच्या उत्पादनाचा खर्च वाढला आहे. याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येत आहे. विशेषतः मिड-रेंजमधील फोन्सच्या किमती हजारो रुपयांनी वाढल्याने ग्राहक हैराण झाले आहेत.
24
मोबाईलची नवी किंमत

सध्या Realme 16 Series ची खूप चर्चा सुरू आहे. Realme 16 Pro+ 5G मॉडेलच्या काही व्हेरिएंट्सची किंमत तब्बल 7,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. याशिवाय OnePlus 15R मॉडेलची किंमतही वाढवण्यात आली आहे. Poco X8 Pro Max आणि Lava Agni 4 हे फोनसुद्धा आता नव्या किमतीत विकले जात आहेत.

34
इलेक्ट्रॉनिक पार्ट्सच्या किमतीत वाढ
बाजार तज्ज्ञांच्या मते, ही दरवाढ तात्पुरती नसेल. जगभरात इलेक्ट्रॉनिक पार्ट्सच्या किमती सातत्याने वाढत असल्याने, येत्या काही महिन्यांत स्मार्टफोनच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः 5G फोन्स आणि जास्त रॅम व स्टोरेज असलेल्या मॉडेल्सवर याचा जास्त परिणाम दिसून येईल, असं म्हटलं जातंय.
44
मेमरी चिपचा तुटवडा
या दरवाढीमुळे, नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करणारे ग्राहक आता सध्याच्या ऑफर्स आणि जुन्या किमतीत उपलब्ध असलेल्या स्टॉककडे लक्ष देत आहेत. 'आता फोन विकत घ्यावा की आणखी वाट पाहावी?' या गोंधळात ग्राहक अडकले आहेत, ज्यामुळे भारतीय स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read more Photos on

Recommended Stories