Mobile Market: नवीन आयफोन मॉडेल बाजारात आलं की लोकांची खरेदीसाठी झुंबड उडते. पण तुम्हाला माहित आहे का? जगातल्या काही देशांमध्ये आयफोन खूपच कमी किमतीत मिळतो. भारताच्या तुलनेत हे देश कोणते आहेत, जिथे तुम्ही स्वस्तात आयफोन खरेदी करू शकता, जाणून घेऊया.
आयफोनचे चाहते जगभर आहेत. नवीन मॉडेल कधी येतंय याची अनेकजण वाट पाहत असतात. पण प्रत्येक देशात आयफोनची किंमत वेगवेगळी असते. काही देशांमध्ये आयफोन खूप महाग असतो, तर काही देशांमध्ये खूप स्वस्त. भारतात आयफोन घेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळेच, तुम्ही परदेशात जाणार असाल तर तिथे स्वस्तात आयफोन खरेदी करू शकता. अनेकजण परदेश दौऱ्यावर असताना स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी आयफोन घेऊन येतात.
24
आयफोन कुठे स्वस्त
जपान, हाँगकाँग, दुबई, कॅनडा, अमेरिका आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये आयफोन खूपच स्वस्तात मिळतो. ऍपल कंपनी अमेरिकेची असल्यामुळे तिथे आयफोन स्वस्त मिळतो. कारण तिथे उत्पादन होतं आणि आयातीचा खर्च नसतो. जपानमध्ये चलनातील बदल, टॅक्समध्ये सूट आणि पर्यटकांना मिळणाऱ्या टॅक्स रिफंडमुळे आयफोन स्वस्तात पडतो. विशेष म्हणजे, हाँगकाँगमध्ये विक्री कर (Sales Tax) नाही, त्यामुळे तिथे फक्त आयफोनच नाही तर इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूही स्वस्त मिळतात.
34
आयफोन खरेदीसाठी दुबई
आयफोन खरेदीसाठी दुबई हे एक मोठं मार्केट आहे. तिथे जीएसटीसारखे टॅक्स खूप कमी आहेत आणि आयात करणंही सोपं आहे. त्यामुळे तिथे किंमती कमी असतात. म्हणूनच भारतातून दुबईला जाणारे लोक मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू तिथूनच खरेदी करून आणतात. याशिवाय कॅनडा आणि दक्षिण कोरियामध्येही स्थानिक बाजारपेठेतील स्पर्धा आणि परिस्थितीमुळे आयफोन भारतापेक्षा कमी किमतीत मिळण्याची शक्यता असते.
भारतात आयफोनच्या जास्त किमतीमागे टॅक्स आणि आयात शुल्क (Import Duty) ही मुख्य कारणं आहेत. आपल्या देशात मोबाईल फोन आणि त्यांच्या पार्ट्सवर अनेक प्रकारचे कर लागतात. यामुळे किंमत वाढते. यावर 18% जीएसटी वेगळा लागतो. तसेच, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी असल्यामुळे परदेशातून येणाऱ्या वस्तू महाग होतात. ऍपल कंपनी प्रत्येक देशातील कर, चलनाचे मूल्य आणि बाजाराची स्थिती पाहून किंमत ठरवते. मात्र, आता ऍपल भारतातच आयफोनचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.