Mobile Market: Apple चा पहिला फोल्डेबल आयफोन सध्याच्या फ्लॅगशिप मॉडेल्सपेक्षा थोडा जास्त जाड असू शकतो, असं नवीन रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. याशिवाय कोणती आहेत याची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात या लेखात
आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्ससोबत आयफोन फोल्ड
रिपोर्ट्सनुसार, Apple सप्टेंबर 2026 मध्ये आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्ससोबत आयफोन फोल्ड लाँच करू शकते. हा स्मार्टफोन 'आयफोन अल्ट्रा' किंवा 'आयफोन फोल्ड' या नावाने बाजारात येऊ शकतो. आता याबद्दल अधिक माहिती समोर येत आहे.
25
Apple च्या पहिल्या फोल्डेबल फोनचं डिझाइन आणि साईज
टेक जगतातील प्रसिद्ध ब्लॉगर लान्झुक (yeux1122) ने काही इंटरनल डायग्रॅम्स शेअर केले आहेत. यातून Apple च्या पहिल्या फोल्डेबल फोनचं डिझाइन आणि साईज समोर आलं आहे. फोल्ड केल्यावर हा फोन 9.23mm जाड असू शकतो, असं दिसतंय. यात कॅमेरा मॉड्यूलची जाडी मोजलेली नाही. तुलनेसाठी, सध्याच्या आयफोन 17 प्रो मॅक्सची जाडी 8.75mm आहे. त्यामुळे, नवीन फोन थोडा जास्त जाड असेल, असं रिपोर्ट्स सांगतात.
35
मॉड्यूलची जाडी
रिपोर्ट्सनुसार, कॅमेरा मॉड्यूलची जाडी 4.46mm आहे. यामुळे फोनचा सर्वात जाड भाग जवळपास 13mm पर्यंत जाईल. आयफोन फोल्डमध्ये दोन कॅमेरा लेन्स, एक LED फ्लॅश आणि सेकंडरी मायक्रोफोन असलेला पिल-शेप (Pill-shaped) कॅमेरा सेटअप असू शकतो. याशिवाय, फोनच्या खालच्या बाजूला यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल दिसू शकतात.
लीक झालेल्या फोटोनुसार, आयफोन फोल्डची उंची 120.59mm असेल. याच्या कव्हर डिस्प्लेवर मध्यभागी होल-पंच कटआऊट दिसतोय, तर आतल्या स्क्रीनवर वरच्या बाजूला डावीकडे आणखी एक कटआऊट आहे. हे दोन्ही कटआऊट्स सेल्फी कॅमेऱ्यांसाठी असतील असं मानलं जातंय.
55
नवीन फोल्डेबल आयफोन
पण, या डायग्रॅममध्ये फेस आयडी सेन्सर्ससाठी कोणतीही वेगळी जागा दिसत नाही. त्यामुळे या मॉडेलमध्ये डायनॅमिक आयलंड (Dynamic Island) फीचर असेल की नाही, हे अजून स्पष्ट नाही. रिपोर्ट्सनुसार, याच्या उजव्या बाजूला पॉवर बटण आणि डाव्या बाजूला व्हॉल्यूम व ॲक्शन बटन्स असतील. Apple ने अधिकृतपणे काहीही सांगितले नसलं तरी, हा नवीन फोल्डेबल आयफोन स्मार्टफोन मार्केटमध्ये मोठे बदल घडवेल, असा अंदाज टेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.