मेनोपॉज: वाढत्या वयानुसार महिलांमध्ये हार्मोनल बदल सामान्य आहेत. चाळीशीनंतर म्हणजेच मेनोपॉजच्या टप्प्यात हे बदल अधिक स्पष्टपणे दिसतात. याचा परिणाम त्वचा आणि केसांवर होतो. वेळीच काळजी न घेतल्यास काय होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का?
वाढत्या वयानुसार, विशेषतः चाळीशीनंतर महिलांच्या शरीरात बदल होतात. त्वचा कोरडी पडते, चमक कमी होते आणि केस पातळ होतात. हे मेनोपॉजपूर्वीच्या हार्मोनल बदलांचे संकेत आहेत.
24
महिलांच्या त्वचेसाठी इस्ट्रोजेन हार्मोन महत्त्वाचे
महिलांच्या त्वचेसाठी इस्ट्रोजेन हार्मोन महत्त्वाचा आहे. वय वाढल्याने तो कमी होतो, ज्यामुळे कोलेजनचे उत्पादन घटते. यामुळे त्वचा कोरडी पडते आणि तिची चमक कमी होते. कोलेजन त्वचेला घट्ट ठेवते.
34
हे सर्व हार्मोनल असंतुलनामुळे होते
हार्मोनल बदलांचा केसांवरही परिणाम होतो. अनेक महिलांना डोक्यावरील केस पातळ होणे, तुटणे आणि गळणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. काही महिलांमध्ये हे चाळीशीतच सुरू होते. तसेच, काही प्रकरणांमध्ये अनावश्यक केस वाढण्याची शक्यता असते. हे सर्व हार्मोनल असंतुलनामुळे होते, असे डॉक्टर सांगतात.
मात्र, या बदलांना घाबरण्याची गरज नाही, असे तज्ज्ञ सांगतात. या टप्प्यात स्किनकेअर आणि हेअरकेअरमध्ये थोडे बदल करणे महत्त्वाचे आहे. त्वचेला ओलावा देणारे मॉइश्चरायझर नियमितपणे वापरावे. तसेच, टाळू स्वच्छ ठेवावी. योग्य पोषण घेतल्यास केसांचे आरोग्य सुधारण्यासही मदत होते.
मेनोपॉज हा आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे, त्याला घाबरू नका. शरीरातील बदल समजून घेऊन योग्य काळजी घेतल्यास या टप्प्याला आत्मविश्वासाने सामोरे जाता येते, असा सल्ला तज्ज्ञ देतात.