Mahindra launches new Bolero and new Bolero Neo range : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज आपल्या लोकप्रिय न्यू बोलेरो रेंजची घोषणा केली आहे. या नवीन रेंजमध्ये न्यू बोलेरो आणि न्यू बोलेरो निओ ही दोन मॉडेल्स बाजारात आणली गेली आहेत.
महिंद्रा बोलेरोने २५ वर्षांचा प्रदीर्घ वारसा आणि १६ लाखांहून अधिक समाधानी ग्राहकांसह भारतीय बाजारात आपले स्थान मजबूत ठेवले आहे. ही बहुमुखी एसयूव्ही शहरांमधील गजबजलेल्या रस्त्यांपासून ते ग्रामीण भागातील खडबडीत वाटांपर्यंत, सर्व प्रकारच्या भूभागांवर उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता ठेवते.
न्यू बोलेरो रेंजच्या किमतीबद्दल बोलायचं झाल्यास, न्यू बोलेरोची किंमत ७.९९ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, तर नवीन टॉप-एंड B8 व्हेरिएंटची किंमत ९.६९ लाख (एक्स-शोरूम) आहे. दुसरीकडे, न्यू बोलेरो निओची किंमत ८.४९ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि नवीन टॉप-एंड N11 व्हेरिएंट ९.९९ लाख (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध आहे.
25
महिंद्राचे अधिकारी सांगतात
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ऑटोमोटिव्ह विभाग, नलिनिकांत गोल्लागुंटा यांनी याबद्दल सांगितले की, "बोलेरोने २५ वर्षांहून अधिक काळ भारताच्या सर्वाधिक बहुमुखी आणि मजबूत एसयूव्हीपैकी एक म्हणून आपले स्थान टिकवून ठेवले आहे. या वारशाला पुढे नेत, न्यू बोलेरो रेंज गतिमान आणि वेगाने विकसित होत असलेल्या 'न्यू इंडिया'च्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. मजबूतपणा, समकालीन स्टायलिंग, आराम आणि आधुनिक फीचर्स यांचा उत्तम मेळ साधत, न्यू बोलेरो आणि बोलेरो निओ दोन्ही मॉडेल्स शहरी तसेच आव्हानात्मक भूभागांवर एक शक्तिशाली एसयूव्हीचा अनुभव देतात."
35
न्यू बोलेरो निओ: आधुनिक शहरी लूक आणि स्मार्ट तंत्रज्ञान
न्यू बोलेरो निओ, बोलेरोची कणखरता आणि शहरी लूकची आधुनिकता यांचा समन्वय साधते. यात स्ट्रायकिंग हॉरिझोंटल ॲक्सेंटसह नवीन आकर्षक ग्रिल आणि डार्क मेटॅलिक ग्रे R16 अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. जीन्स ब्लू आणि कॉंक्रिट ग्रे हे नवीन रंग पर्याय तसेच तीन ड्युअल-टोन पर्याय उपलब्ध आहेत. आतील भागात लूनार ग्रे आणि मोचा ब्राऊन या दोन नवीन थीममुळे सौंदर्य वाढले आहे. आरामदायी प्रवासासाठी यात लेदरेट अपहोल्स्ट्रीसह सुधारित सीट एर्गोनॉमिक्स दिले आहेत. २२.८ सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, मागील दृश्य कॅमेरा आणि USB C-type चार्जिंग पोर्टमुळे तंत्रज्ञान अधिक स्मार्ट झाले आहे. RideFlo तंत्रज्ञानासोबत MTV-CL आणि फ्रिक्वेन्सी डिपेंडंट डॅम्पिंग (FDD) मुळे खडबडीत रस्त्यांवरही स्मूथ आणि नियंत्रित ड्राइव्हचा अनुभव मिळतो. mHAWK100 इंजिन (७३.५ kW पॉवर आणि २६० Nm टॉर्क) द्वारे ही एसयूव्ही चालते. याशिवाय, यात क्रूझ कंट्रोल आणि मल्टी-टेरेन टेक्नॉलॉजी (MTT) सारखे प्रगत फीचर्स समाविष्ट आहेत, जे आव्हानपूर्ण रस्त्यांवर उत्कृष्ट ट्रॅक्शन देतात.
न्यू बोलेरो: डिझाइनमध्ये बोल्डनेस आणि आरामदायी अनुभव
नवीन बोलेरोने आपल्या मूळ कणखरतेला कायम ठेवून त्यात बोल्ड डिझाइन आणि आधुनिक सुविधांचा समावेश केला आहे. यात नवीन बोल्ड ग्रिल आणि फ्रंट फॉग लॅम्प्स देण्यात आले आहेत. सोबतच डायमंड-कट R15 अलॉय व्हील्स तिचा लूक अधिक आकर्षक बनवतात. स्टेल्थ ब्लॅक हा नवीन रंग पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे, ज्यामुळे ही एसयूव्ही अधिक स्टायलिश दिसते. आतील भागात लेदरेट अपहोल्स्ट्रीसह सुधारित सीट कंटूरमुळे आराम वाढला आहे. यात १७.८ सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, स्टिअरिंग-माउंटेड कंट्रोल्स आणि USB C-type चार्जिंग पोर्ट सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. RideFlo तंत्रज्ञानामुळे सुधारित सस्पेंशन आर्किटेक्चरसह उत्कृष्ट स्थिरता आणि नियंत्रण मिळते. यात mHAWK75 इंजिन आहे, जे ५५.९ kW पॉवर आणि २१० Nm टॉर्क निर्माण करते. या गाडीला २० किलोमीटरचा मायलेज मिळतो.
55
खास सादरीकरण
न्यू बोलेरो आणि न्यू बोलेरो निओ या दोन्ही मॉडेल्ससह महिंद्राने भारतीय ग्राहकांसाठी अधिक आराम, सुरक्षा आणि आधुनिक फीचर्ससह, एसयूव्हीची कणखरता कायम ठेवणारी रेंज सादर केली आहे. त्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.