Cylinder Price Hike : वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG सिलिंडरने दिला दरवाढीचा झटका, महत्त्वाची अपडेट

Published : Jan 01, 2026, 09:13 AM IST

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना दरवाढीचा धक्का बसला आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे या वेळीही घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमती अपडेट केल्या आहेत. दरात किती वाढ झाली आहे, हे जाणून घेऊयात. 

PREV
15
एलपीजी गॅस सिलिंडर -

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना दरवाढीचा धक्का बसला आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे या वेळीही घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमती अपडेट केल्या आहेत. दरात किती वाढ झाली आहे, हे जाणून घेऊयात.

25
१९ किलोचा एलपीजी सिलिंडर -

इंडियन ऑइलनुसार, दिल्लीत आजपासून १९ किलोचा एलपीजी सिलिंडर १५८०.५० रुपयांऐवजी १६९१.५० रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात तो आता १७९५ रुपयांना उपलब्ध होईल. कोलकात्यातही १११ रुपयांची वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये १८४९.५० रुपये आणि बंगळूरमध्ये १७०० रुपयांच्या आसपास व्यावसायिक सिलेंडर मिळेल.

35
घरगुती वापराचा १४ किलोचा सिलिंडर -

घरगुती वापराच्या १४ किलोच्या सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दर स्थिर असून, सध्या दिल्लीत ₹८५३, मुंबईत ₹८५२.५०, बंगळूरमध्ये ८५५.५० रुपयांना मिळेल. २०२५ मध्ये अनेक वेळा व्यावसायिक वापराच्या १९ किलो सिलिंडरची किंमत कमी झाली होती.

45
किमतींमध्ये लक्षणीय बदल -

जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ पर्यंत व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये लक्षणीय बदल दिसून आले आहेत. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईसारख्या महानगरांमध्ये प्रति सिलेंडर सरासरी ₹२३८ ने किमती घसरल्या आहेत. आता कोणत्या महिन्यात किती कमी झाले, ते पाहूया.

55
२०२५ मध्ये कोणत्या महिन्यात किती घट? -

जानेवारी: १४.५० रुपये

फेब्रुवारी: ४ ते ७ रुपये

एप्रिल: ४१ ते ४४.५० रुपये

मे: १४.५० ते १७ रुपये

जून: २४ ते २५.५० रुपये

जुलै: ५७ ते ५८.५० रुपये

ऑगस्ट: ३३.५० ते ३४.५० रुपये

सप्टेंबर: ५०.५० ते ५१.५० रुपये

नोव्हेंबर: ४.५० ते ६.५० रुपये

डिसेंबर: १० ते १०.५० रुपये

Read more Photos on

Recommended Stories