LIC पॉलिसी मुदतीपूर्वी बंद केल्यास होणारे आर्थिक नुकसान यात स्पष्ट केले. यामुळे विमा संरक्षण गमावणे, कमी सरेंडर व्हॅल्यू मिळणे, भविष्यातील लाभ न मिळणे असे तोटे होतात. पॉलिसी पूर्णपणे बंद करण्याऐवजी पेड-अप व्हॅल्यू हा चांगला पर्याय यात सुचवले आहे.
LIC Policy Surrender Rules: आयुष्यात कधी ना कधी आर्थिक चणचण भासते आणि अशा वेळी अनेकजण सगळ्यात आधी आपली LIC पॉलिसी बंद करण्याचा विचार करतात. प्रीमियमचे ओझे कमी करण्यासाठी हा पर्याय सोपा वाटत असला, तरी प्रत्यक्षात तो तुमच्या खिशाला मोठी कात्री लावणारा ठरू शकतो. पॉलिसी 'सरेंडर' करणे म्हणजे नक्की काय आणि त्यामुळे तुमचे किती नुकसान होते, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
25
पॉलिसी 'सरेंडर' करणे म्हणजे काय?
जेव्हा तुम्ही मुदत संपण्यापूर्वी (Maturity) तुमची विमा पॉलिसी अधिकृतपणे रद्द करता, तेव्हा त्याला 'सरेंडर' करणे म्हणतात. अनेक प्रवाशांना असे वाटते की त्यांनी भरलेला सर्व प्रीमियम त्यांना परत मिळेल, परंतु तसे नसते. विमा कंपनी तुम्हाला जी रक्कम परत करते तिला 'सरेंडर व्हॅल्यू' म्हणतात. ही रक्कम तुमच्या एकूण प्रीमियमपेक्षा बऱ्याचदा कमी असते.
35
पॉलिसी बंद केल्यास होणारे ३ मोठे तोटे
१. सुरक्षा कवच हरवून बसाल: पॉलिसी बंद करताच तुमचे लाइफ कव्हर (विमा संरक्षण) संपुष्टात येते. दुर्दैवाने भविष्यात काही अघटित घडल्यास तुमच्या कुटुंबाला किंवा वारसाला कोणताही क्लेम मिळत नाही. ज्या उद्देशासाठी तुम्ही विमा घेतला होता, तोच मूळ हेतू नष्ट होतो.
२. जमापुंजीवर पडते दरोडा: पॉलिसीच्या सुरुवातीच्या काळात कंपनीचा बराच खर्च एजंट कमिशन आणि प्रशासकीय कामात जातो. त्यामुळे जर तुम्ही सुरुवातीच्या २-४ वर्षांतच पॉलिसी बंद केली, तर तुम्हाला अत्यंत कमी पैसे परत मिळतात. शिवाय, एंडोमेंट किंवा मनी-बॅक पॉलिसीमध्ये मिळणारे बोनस आणि लॉयल्टी बेनिफिट्स एका झटक्यात शून्य होतात.
३. भविष्यातील लाभ संपुष्टात: दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे मिळणारे व्याजाचे आणि चक्रवाढ व्याजाचे फायदे तुम्ही गमावता. नवी पॉलिसी घ्यायची ठरवल्यास वाढत्या वयानुसार तुम्हाला जास्त प्रीमियम भरावा लागेल.
जर तुम्हाला पैशांची अडचण असेल, तर पॉलिसी पूर्णपणे बंद करण्याऐवजी 'पेड-अप व्हॅल्यू' (Paid-up Value) चा विचार करा.
कसा असतो हा मार्ग? तुम्ही पुढील प्रीमियम भरणे थांबवू शकता, पण पॉलिसी बंद होत नाही.
फायदा काय? तुमचा विमा कव्हर कमी होतो, पण तो मॅच्युरिटीपर्यंत सुरू राहतो. मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला ठराविक रक्कम परत मिळते.
55
तज्ज्ञांचा सल्ला
विमा नियामक IRDAI ने नुकतेच सरेंडर व्हॅल्यूचे नियम थोडे सुलभ केले आहेत. तरीही, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या एजंटशी किंवा एलआयसी ऑफिसमध्ये जाऊन 'सरेंडर व्हॅल्यू' आणि 'पेड-अप व्हॅल्यू' या दोन्हीची तुलना नक्की करा.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .