Kitchen Tips: कांदा कापताना डोळ्यात पाणी येणं सामान्य आहे. त्यामुळे अनेकांना कांदा कापायला आवडत नाही. तुम्हालाही हा त्रास होत असेल, तर इथे सांगितलेल्या ट्रिक्स नक्की ट्राय करा. यामुळे डोळ्यातून पाणी येण्याला तुम्ही कायमचा बाय-बाय म्हणू शकता.
कांदा कापताना डोळ्यात जळजळ किंवा पाणी येण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यात असलेले सल्फर कंपाऊंड्स. जेव्हा आपण कांदा कापतो, तेव्हा हे कंपाऊंड्स हवेत पसरतात आणि त्यामुळे डोळ्यातून पाणी येतं. पण आता चिंता करू नका, या समस्येपासून वाचण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत.
25
कांदा फ्रीजमध्ये ठेवा
ही पद्धत खूप प्रभावी आहे. कांदा कापण्याआधी किमान 10 ते 30 मिनिटं तो फ्रिजमध्ये ठेवा. किंवा 5-10 मिनिटांसाठी फ्रिझरमध्ये ठेवा. कांदा थंड झाल्यामुळे, डोळ्यातून पाणी आणणारे वायू बाहेर टाकणाऱ्या एन्झाइम्सची प्रक्रिया मंदावते. यामुळे डोळ्यात पाणी येत नाही.
35
वाहत्या पाण्याखाली ठेवा
जर तुमच्याकडे कांदा फ्रिजमध्ये ठेवायला वेळ नसेल, तर तो वाहत्या पाण्याखाली किंवा पाण्यात ठेवून कापा. म्हणजे, कांद्याची सालं काढून तो पाण्याने भरलेल्या भांड्यात कापला तरी चालेल. यामुळे डोळ्यात पाणी येणं टाळता येतं.
हे ऐकायला विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. कांदा कापण्यासाठी नेहमी धारदार चाकू वापरा. धारदार चाकूने कांदा व्यवस्थित कापला जातो आणि कापायला वेळही कमी लागतो. यामुळे डोळ्यातून पाणी येणं टाळता येतं.
55
मुळाकडचा भाग शेवटी कापा
कांद्याचा मुळाकडचा भाग, म्हणजे खालचा भाग, सगळ्यात शेवटी कापा. कारण त्यात डोळ्यात पाणी आणणारे कंपाऊंड्स जास्त प्रमाणात असतात. आधी वरचा भाग कापून मुळाकडचा भाग तसाच ठेवा. यामुळे गॅस कमी तयार होतो आणि डोळ्यात पाणी येत नाही.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .