Kitchen Tips: प्रेशर कुकर वापरताना या चुका टाळा, नाहीतर जीवावर बेतेल! जाणून घ्या

Published : Apr 28, 2026, 10:10 PM IST

Kitchen Tips: आजच्या धावपळीच्या आयुष्यात कुकर हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग बनला आहे. यामुळे वेळ आणि गॅस दोन्ही वाचतात, पण तो तितकाच धोकादायकही ठरू शकतो. आपल्या छोट्याशा चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे कुकर बॉम्बसारखा फुटू शकतो.

PREV
16
हे 5 महत्त्वाचे नियम नक्की पाळा

आजच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये प्रेशर कुकरशिवाय स्वयंपाकघराची कल्पनाच करता येत नाही. कमी वेळेत स्वयंपाक करण्यासाठी तो खूप उपयोगी पडतो. पण, थोडासा निष्काळजीपणा केला, तर तो बॉम्बसारखा फुटून जीवघेणा ठरू शकतो. कुकरचा स्फोट का होतो, याचा विचार केल्यास आपल्याच काही सामान्य चुका या अपघातांना कारणीभूत ठरतात हे लक्षात येतं. असे धोके टाळण्यासाठी हे 5 महत्त्वाचे नियम नक्की पाळा.

26
कुकर पूर्ण क्षमतेने भरू नका
स्वयंपाकघरात प्रेशर कुकर वापरल्याने वेळ आणि गॅस दोन्ही वाचतात. पण, तो निष्काळजीपणे वापरल्यास जीवघेणे अपघात होऊ शकतात. अनेक जण स्वयंपाक लवकर व्हावा म्हणून कुकर पूर्ण भरतात. पण कुकर त्याच्या क्षमतेच्या दोन-तृतीयांश (2/3) पेक्षा जास्त कधीही भरू नये. विशेषतः डाळ आणि तांदूळासारखे पदार्थ शिजल्यावर फुगतात. त्यामुळे ते अर्धेच भरणं जास्त सुरक्षित आहे.
36
गॅस्केट (रबर) ची गुणवत्ता तपासा
कुकरच्या झाकणाचं रबर सैल झालं असेल किंवा त्याला तडे गेले असतील, तर ते लगेच बदला. खराब गॅस्केटमुळे वाफ बाजूने बाहेर पडते आणि आतमध्ये योग्य दाब तयार होत नाही. यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.
46
पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा
कुकरमध्ये आवश्यकतेनुसार पाणी न घालता स्वयंपाक करणं खूप धोकादायक आहे. पाणी नसेल तर कुकरचा तळ जास्त गरम होतो आणि 'सेफ्टी व्हॉल्व्ह' फुटू शकतो. त्यामुळे शिजवण्याच्या पदार्थानुसार योग्य प्रमाणात पाणी घाला.
56
व्हेंट पाईपची स्वच्छता
प्रेशर कुकरच्या झाकणावर असलेली व्हेंट पाईप (शिट्टीच्या खाली असलेलं छिद्र) नेहमी स्वच्छ असायला हवी. त्यात अन्नाचे कण अडकले, तर आत तयार झालेली वाफ बाहेर जाऊ शकत नाही. यामुळे आतमध्ये प्रचंड दाब वाढून कुकर फुटण्याचा धोका असतो.
66
झाकण जबरदस्तीने उघडू नका
कुकरमधील दाब (प्रेशर) पूर्णपणे कमी होण्याआधी झाकण जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न करू नका. स्वयंपाक झाल्यावर लगेच झाकण उघडायला जाऊ नका. शिट्टी काढली तरी आत थोडी वाफ शिल्लक असू शकते. दाब पूर्णपणे कमी झाला आहे याची खात्री झाल्यावरच झाकण उघडा. ही पाच काळजी घेतल्यास तुम्ही तुमचं स्वयंपाकघर सुरक्षित ठेवू शकता. तुमचा कुकर नियमित तपासा आणि धोक्यांपासून दूर राहा.
Read more Photos on

Recommended Stories