Kitchen Hacks: तांदूळ आणि डाळींना कीड लागणं ही प्रत्येक गृहिणीसाठी एक मोठी डोकेदुखी असते. ही कीड काढण्यासाठी खूप त्रास होतो. पण एका सोप्या घरगुती उपायाने तुम्ही ही समस्या कायमची दूर करू शकता.
तांदूळ आणि डाळींमधील कीड घालवण्यासाठी लवंग, दालचिनी आणि कापूर पुरेसे आहेत. आधी मिक्सरच्या भांड्यात थोडे लवंग आणि दालचिनी घेऊन त्याची बारीक पावडर करा. आता त्यात कापराच्या तीन वड्यांची पूड करून चांगले मिसळा. हे मिश्रण एका पातळ कापडात टाकून त्याची पुरचुंडी बांधा. ही पुरचुंडी तांदूळ आणि डाळींच्या डब्यात ठेवा. या वासाने असलेले किडे पळून जातील आणि भविष्यातही लागणार नाहीत. यात कोणतीही केमिकल्स नसल्याने साईड इफेक्ट्सचा धोका नाही.
22
हे उपायही आहेत प्रभावी!
सुकी लाल मिरची: तांदळाच्या डब्यात जागोजागी काही सुक्या लाल मिरच्या ठेवा. मिरचीच्या तिखटपणामुळे किडे तांदळाजवळ येत नाहीत. डाळींसाठीही हा उपाय प्रभावी आहे. तमालपत्र: तमालपत्राचा विशिष्ट वास किड्यांना अजिबात सहन होत नाही. तांदूळ किंवा डाळींच्या डब्यात वरच्या बाजूला ३-४ तमालपत्र ठेवा. यामुळे किडे दूर राहतात आणि धान्याला चांगला सुगंधही येतो. कडुलिंबाची पाने: हा आपल्या आजी-आजोबांच्या काळातील उपाय आहे. वाळलेली कडुलिंबाची पाने एका पातळ कापडात बांधून तांदळाच्या पोत्यात किंवा डब्यात ठेवा. कडुलिंबाच्या कडूपणामुळे कोणतेही किडे जवळ येत नाहीत. मोहरीचे तेल: विशेषतः तूर डाळ, मूग डाळ यांना कीड लागू नये म्हणून, एक किलो डाळीला एक चमचा मोहरीचे तेल लावून चांगले मिसळा. थोडा वेळ उन्हात ठेवून नंतर डब्यात भरा. तेलाच्या चिकटपणामुळे किडे अंडी घालू शकत नाहीत. खडे मीठ (Rock Salt): तांदूळ साठवताना त्यात थोडे खडे मीठ मिसळून ठेवल्यास कीड लागत नाही. मीठ ओलावा शोषून घेते आणि तांदूळ कोरडे ठेवते, ज्यामुळे किड्यांची वाढ होत नाही.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .