Jio International Roaming रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त नवीन ऑफर आणली आहे. विशेष म्हणजे, या सुविधेसाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाहीत.
Jio International Roaming रिलायन्स जिओने आपल्या युझर्ससाठी एक नवीन मोफत सेवा सुरू केली आहे. परदेशात प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी ही सेवा खूप फायदेशीर ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यासाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही.
25
आंतरराष्ट्रीय रोमिंग
Jio International Roaming या नवीन सुविधेमुळे, तुम्ही परदेशात असतानाही वाय-फाय कॉलिंग (VoWiFi) द्वारे येणारे SMS मोफत मिळवू शकता. यासाठी तुम्हाला इंटरनॅशनल रोमिंग (IR) पॅक सक्रिय करण्याची गरज नाही. त्यामुळे OTP आणि बँकेचे अलर्ट्स सहज मिळतील.
35
नवीन सेवा
Jio International Roaming ही सेवा पूर्णपणे वाय-फाय नेटवर्कवर अवलंबून आहे. यासाठी तुमचा मोबाईल वाय-फायला कनेक्ट केलेला असावा आणि वाय-फाय कॉलिंगचा पर्याय चालू केलेला असावा. या दोन अटी पूर्ण झाल्यास, तुम्हाला थेट तुमच्या फोनवर SMS मिळतील.
बँकेचे व्यवहार, लॉग-इन व्हेरिफिकेशन आणि OTP यांसारख्या महत्त्वाच्या माहितीसाठी ही सेवा खूप उपयुक्त आहे. परदेशात असताना रोमिंगचे पैसे न भरता अशी महत्त्वाची माहिती मिळणं, हा युझर्ससाठी एक मोठा फायदा आहे.
55
जिओ वापरकर्ते
ही सुविधा वापरण्यासाठी, तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन 'Wi-Fi Calling' चालू करा आणि परदेशात वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट व्हा. यासाठी टेलिकॉम ऑपरेटरकडून कोणतंही वेगळं ॲक्टिव्हेशन करण्याची गरज नाही. यामुळे जिओ युझर्सना कोणताही खर्च न करता कनेक्टेड राहता येईल.